मेळघाटात १६ वाघ, २९ बिबट्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 02:56 PM2019-05-20T14:56:53+5:302019-05-20T14:57:51+5:30

बुध्द पौर्णिमेच्या ‘मचाण स्टे’ अंतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पात निसर्गप्रेमींना १६ वाघ व २९ बिबट्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले.

Visiting 16 tigers, 29 leopards in Melghat | मेळघाटात १६ वाघ, २९ बिबट्यांचे दर्शन

मेळघाटात १६ वाघ, २९ बिबट्यांचे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देमचाण स्टे ३५९ निसर्ग प्रेमींचा सहभाग

अनिल कडू
अमरावती : बुध्द पौर्णिमेच्या ‘मचाण स्टे’ अंतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पात निसर्गप्रेमींना १६ वाघ व २९ बिबट्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. तर अन्य पाच ठिकाणी वाघाच्या डरकाळ्या त्यांना ऐकू आल्या. मचाण सेन्सस (गणना) अंतर्गत एकूण ४०६ मचाणी पाणवठ्यानजिक बनविण्यात आल्या होत्या. पौर्णिमेच्या च्रंद्र प्रकाशात या मचाणवर बसून पाणवठ्यावर प्रत्यक्ष पाणी प्यायला येणाऱ्या, पाणी पितांना दिसणाºया वन्यजीवांची नोंद निसर्गप्रेमींना घ्यावयाची होती. यात ३५९ निसर्गप्रेमी सहभागी झाले.
निसर्ग प्रेमींना व्याघ्र दर्शनासह २०९ अस्वली, १२५ जंगली कुत्रे, ५५८ बायसन, ५३१ जंगली डुक्कर, ६१२ सांबर, २६७ चितळ, २६७ भेडकी, ३९ चौसिंगा, ३१ सायळ, ७५ जंगली मांजर, ३० तडस, २१६ निलगायी, ८८९ माकडे व १८ चांदी अस्वल बघायला मिळाल्यात.

काटेपूर्णा- ज्ञानगंगा
काटेपूर्णा, ज्ञानगंगा व कारंजा अभयारण्यामधील एकूण ४० मचाणींवर ५२ निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदविला. या ठिकाणी कुणालाही वाघ दिसला नाही. दोन बिबट मात्र बघायला मिळालेत. या सोबतच ११ अस्वली, ४८८ जंगली डूक्कर, २५ सांबर, ५ भेडकी, ५८ चितल, १९९ निलगायी, ६ सायली, १ तडस, आणि ७९ माकडे दिसल्याची नोंद निसर्ग अनुभवांतर्गत निसर्गप्रेमींनी केली आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये सहभागी निसर्गप्रेमींची संख्या व प्रत्यक्ष दिसलेल्या वन्यजीवांची संख्या अधिक आहे.

 

Web Title: Visiting 16 tigers, 29 leopards in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ