वाघ याच्या अर्जावर बुधवारी खामगाव न्यायालयात सुनावणी, एसीबीच्या अधिका-यांची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 06:33 PM2017-11-13T18:33:31+5:302017-11-13T18:33:37+5:30
अमरावती : बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रकरणातील एसीबीला हवा असलेल्या चंद्रपूरच्या कार्यकारी अभियंत्याने खामगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. संजय वाघ याला जामीन मिळतो की न्यायालय अर्ज फेटाळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. यावरच पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. संजय वाघ अद्यापही फरार असून, एसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर आहेत.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ (नागपूर) अंतर्गत नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाचे काम सुरू आहे. यवतमाळच्या बाजोरfया कन्स्ट्रक्शन कंपनीला बनावट प्रमाणपत्राद्वारे हे काम मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महाराष्ट्र जीवन प्रधिकरणचे चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता संजय वाघ याचा महत्त्वाचा रोल असल्याचे एसीबीच्या अधिकाºयांच्या तपासात निष्पन्न झाले आहेत. खामगाव शहर ठाण्यात ४ नोव्हेंबरला मजीप्राचा चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता संजय वाघसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी वाघ याने अर्ज केला होता. त्यावर १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होत आहे. एसीबीने चार दिवसांपूर्वीच वाघचे चंद्रपुरातील निवास्थान सील केले होते. मजीप्राला सोमवारी एसीबीने जिगाव प्रकरणात वाघ हा आरोपी असल्याचे अधिकृत पत्राद्वारे कळविले आहे.