२०० शाळा नाविन्यपूर्ण उपक्रमात
By Admin | Published: October 25, 2015 11:43 PM2015-10-25T23:43:46+5:302015-10-26T00:01:28+5:30
लातूर : केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासनाने ३५ लाख रुपयांचा निधी शिक्षण विभागाला दिला आहे़
लातूर : केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासनाने ३५ लाख रुपयांचा निधी शिक्षण विभागाला दिला आहे़ आता या उपक्रमात जिल्ह्यातील २०० शाळांची निवड करण्यात आली असून, या शाळांत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे़
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यसाठी शासन विविध उपाय योजना केल्या जात आहे़ त्यानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्साठी नाविन्य पूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे़ या विविध योजना राबवताना ग्रामीण भागातील शाळेवर आर्थिंक मर्यादा पडत आहेत़ कल्पकता जरी शिक्षकांकडे असली तरी ती निधी अभावी योग्य पध्दतीने सर्व कल्पना वास्तवात आणता येत नाहीत़ याची दखल राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्तरित्या सर्वशिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण विभागाकडे बुधवारी ३५ लाखाचा निधी जमा करण्यात आला आहे़ या निधीचा जिल्हा परिषदेने निवडलेल्या शाळेत मुलभूत भौतिक सुविधा, विघुत कनेक्शन तसेच अ, ब दर्जा प्राप्त असलेल्या शाळेतील केंद्र प्रमुखांच्या निर्देशानुसार शाळेंची निवड करण्यात आली आहे़ या निवडलेल्या २०० शाळेवर प्रत्येकी १७ हजार ५०० रुपये खर्च केले जाणार आहे़ यासाठी लवकरच जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे़ नाविन्या पूर्ण उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्याना वाचन तसेच उपयुक्त अशा नवनवीन संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना दर्जादार शिक्षणा देण्याची योजना आखली जात आहे़ शहरीकरण्याच्या ओघात ग्रमीण भागातील विद्यार्थ्यांचे लोंढे शहराकडे येत आहेत़ ते थांबवण्यासाठी नाविन्य पूर्ण उपक्रम जि़प़च्या शाळेसाठी महित्वाचा ठरणार आहे़