खंडणीच्या घटनेनंतरही आरटीओ कार्यालयात दलालांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:03 AM2017-12-03T01:03:13+5:302017-12-03T01:03:21+5:30

लिपिक महिलेला धमकावून खंडणी उकळण्याच्या घटनेनंतरही आरटीओ कार्यालयात दलालांना अभय दिले जात आहे. कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी दलालांनी बस्तान मांडले आहे; परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

After the ransom incident, the absconding members of the RTO office | खंडणीच्या घटनेनंतरही आरटीओ कार्यालयात दलालांना अभय

खंडणीच्या घटनेनंतरही आरटीओ कार्यालयात दलालांना अभय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लिपिक महिलेला धमकावून खंडणी उकळण्याच्या घटनेनंतरही आरटीओ कार्यालयात दलालांना अभय दिले जात आहे. कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी दलालांनी बस्तान मांडले आहे; परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
आरटीओ कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी लिपिक महिलेकडून नोकरी घालविण्याची धमकी देऊन एक लाख रुपये उकळणाºया दोघांना गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. आरोपी हे आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करणारेच असल्याचे समोर आले. २ नोव्हेंबर रोजी आरटीओ कार्यालयातील अधिका-यांच्या रिकाम्या कक्षात बसलेल्या चौघांना कोंडण्याची कारवाई करण्यात आली; परंतु त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे टाळले. त्यामुळे चौघांवर कोणतीही कारवाई झाली नाही. आता तर कर्मचाºयांना एजंट धमकावीत असल्याचे समोर आले; परंतु यानंतरही एजंटांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे दिसते. त्यामुळे वाहनधारकांबरोबर कर्मचाºयांतूनही संताप व्यक्त होत आहे.
प्रवेशावर लक्ष
कार्यालयाच्या आतमध्ये येणाºयांवर लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षारक्षक, कर्मचारी नेमून प्रत्येकाची नोंद ठेवली जात आहे; परंतु कार्यालयाच्या परिसरात ठाण मांडलेल्या दलालांवर कृपादृष्टी दाखविली जात आहे.
चार भिंतींच्या आतमध्येच शिस्त लावली जात आहे; परंतु कार्यालयाच्या आवाराकडे कानाडोळा होत असल्याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे.

Web Title: After the ransom incident, the absconding members of the RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.