... अन् रावसाहेब दानवेंच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 11:10 AM2018-10-08T11:10:52+5:302018-10-08T11:11:40+5:30

ब्रम्हगव्हाण उपसासिंचन टप्पा दोनच्या कामासाठी आयोजित बैठकीत खा. रावसाहेब दानवे यांनाही निमंत्रण करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपले भाषण

... and during the speech of Ravasaheb Dananve, the farmers made a mess | ... अन् रावसाहेब दानवेंच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

... अन् रावसाहेब दानवेंच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

googlenewsNext

औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावासाहेब दानवे यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी गोंधळ केला. तसेच दावने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत हा प्रश्न कधी मार्गी लावणार असा जाबही विचारला. जिल्ह्यातील ब्रम्हगव्हाण उपसासिंचन आढावा बैठक पैठण येथील खेर्डामध्ये पार पडली. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. 

ब्रम्हगव्हाण उपसासिंचन टप्पा दोनच्या कामासाठी आयोजित बैठकीत खा. रावसाहेब दानवे यांनाही निमंत्रण करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपले भाषण सुरू करताच, काही वेळातच शेतकऱ्यांनी त्यांच्या भाषणात गोंधळ सुरू केला. दानवे यांना जाब विचारत ब्रम्हगव्हाण ऊपसिंचन योजना कधी पूर्ण होणार, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजीही केली. तसेच खतांच्या वाढलेल्या दरांबाबत शेतकऱ्यांनी दानवेंना प्रश्न विचारले. या कार्यक्रमात संतप्त शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून दानवेंनी 5 मिनिटांसाठी आपले भाषण थांबवत शेतकऱ्यांची समजूत काढली. ब्रम्हगव्हाण उपसासिंचन योजनेचा पहिला टप्पा लवकरच मार्गी लागावा आणि दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू व्हावे यासाठी लागेल होत पैसा सरकार देईल. मात्र, लवकरात लवकर 41 कोटी रुपये देणार असल्याचे दानवेंनी सांगितले. त्यानंतर, भाषण आवरते घेत कार्यक्रमाचा लवकरच समारोप करण्यात आला. 

दरम्यान, आमच्या सरकारच्या काळात दुष्काळ नाही, विरोधकांकडून विनाकारण दुष्काळ असल्याचा दावा केला जात आहे. सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, जर दुष्काळ असेल तर केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवला जाईल, असेही दानवेंनी म्हटले. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यापासून दावने यांच्याबद्दल काही शेतकऱ्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच दानवे यांना नेहमीच शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.  
 

Web Title: ... and during the speech of Ravasaheb Dananve, the farmers made a mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.