सर्व्हर डाऊन झाल्यामुळे औरंगाबादचे रजिस्ट्री कार्यालय ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:42 PM2018-01-24T23:42:53+5:302018-01-24T23:43:00+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक व नोंदणी शुल्क (रजिस्ट्री) कार्यालयातील सर्व्हर स्पेस नसल्यामुळे डाऊन झाले आहे. परिणामी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. राज्यभरातच ही अवस्था असल्याची माहिती समोर आली असून, सर्व्हर अपडेट होण्यासाठी किमान आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Aurangabad registry office jammed due to server down! | सर्व्हर डाऊन झाल्यामुळे औरंगाबादचे रजिस्ट्री कार्यालय ठप्प!

सर्व्हर डाऊन झाल्यामुळे औरंगाबादचे रजिस्ट्री कार्यालय ठप्प!

googlenewsNext
ठळक मुद्देआॅनलाईन सेवा बंद : डाटा जास्त झाल्यामुळे गती मंदावली

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक व नोंदणी शुल्क (रजिस्ट्री) कार्यालयातील सर्व्हर स्पेस नसल्यामुळे डाऊन झाले आहे. परिणामी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. राज्यभरातच ही अवस्था असल्याची माहिती समोर आली असून, सर्व्हर अपडेट होण्यासाठी किमान आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
नोटाबंदीनंतर औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील जमीन खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला. २०१७ च्या मध्यान्हापर्यंत व्यवहार सुरळीत झाले नव्हते. अजूनही शेतजमिनींच्या व्यवहाराचे प्रमाण नगण्य आहेत. रोखीच्या व्यवहारावर अनेक निर्बंध आल्यामुळे जमिनींचे भाव गडगडले आहेत. जमिनीच्या व्यवहारांना अजूनही चालना मिळत नाही. अशातच जे थोडेफार व्यवहार सुरू आहेत. त्यातही आॅनलाईनचे विघ्न येत आहे. रजिस्ट्री करण्यासाठी येणाºया अनेकांची त्यामुळे तारांबळ होत असून, एका रजिस्ट्रीसाठी तासन्तास थांबण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. मागील पूर्ण आठवड्यात सर्व्हर डाऊन होते. या आठवड्यातही सर्व्हर डाऊन असल्यामुळे दस्त नोंदणीच्या कामाला गती येत नाही. तालुकास्तरावरील सर्व कार्यालये रजिस्ट्री आॅफिसशी आॅनलाईन जोडलेले आहेत. तसेच विभागातील दोन जिल्हेही कनेक्ट आहेत. औरंगाबाद कार्यालय पुणे कार्यालयाशी जोडलेले आहे. राज्यभर आॅनलाईन डाटा संकलनाचे काम मंदावल्यामुळे दस्त नोंदणीवर त्याचा परिणाम झाला आहे.
अधिकाºयांचा दावा असा
मुद्रांक विभागातील वरिष्ठ अधिकारी जी. एस. कोळेकर यांनी सांगितले, दोन-तीन दिवसांत पूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येईल. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दस्त नोंदणीला वेळ लागतो आहे. मुख्यालयापासून खालपर्यंत सर्व यंत्रणा सर्व्हर अपडेट करण्यात गुंतलेली आहे. डाटा संकलनासाठी पर्यायी व्यवस्था होताच, पूर्ण स्पीडने आॅनलाईन दस्त नोंदणी होईल, असा दावा त्यांनी केला.

Web Title: Aurangabad registry office jammed due to server down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.