औरंगाबादच्या रोहिला गल्लीत खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:08 AM2017-12-11T00:08:32+5:302017-12-11T00:08:39+5:30

रोहिला गल्लीत एका घरात बसलेल्या ४५ वर्षीय आॅप्टिकल व्यावसायिकावर तलवारीने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा दोन महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली.

Blood in Rohilla Galli of Aurangabad | औरंगाबादच्या रोहिला गल्लीत खून

औरंगाबादच्या रोहिला गल्लीत खून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रोहिला गल्लीत एका घरात बसलेल्या ४५ वर्षीय आॅप्टिकल व्यावसायिकावर तलवारीने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा दोन महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली.
सय्यद अकील हुसेन हमीद हुसेन (रा. नूर कॉलनी, जुनाबाजार) असे मृताचे नाव आहे. सय्यद अकील यांचे कुटुंब शहरात अनेक वर्षांपासून आॅप्टिकल चष्म्याच्या व्यवसायात आहे. सय्यद अकील हे आज दुपारी रोहिला कॉलनीत राहणाºया सीमा बेगम (नाव बदलले) यांच्या घरी आले होते. तेथे सीमा आणि त्यांच्या मुलीसोबत ते बोलत असताना दोन तरुण अचानक तेथे आले आणि त्यांनी अकील यांच्यावर धारदार तलवारीने हल्ला चढविला. या घटनेत अकील यांच्या पोटावर, छातीवर आणि डोक्यावर वार करण्यात आले. यामुळे अकील यांच्या पोटातील आतडे तुटून बाहेर पडले.
मारेकरी रिक्षाचालक?
घटनास्थळी टी पॉयवर ताट, तांब्या, भाजी आणि नान रोटी आणि रक्ताने माखलेली खुर्ची आढळली. सय्यद अकील हे खुर्चीवर बसून जेवणाची तयारी करीत असतानाच त्यांच्यावर हा हल्ला झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. प्लास्टिक खुर्ची रक्ताने माखलेली होती. शिवाय घटनास्थळावरून एक शस्त्र पोलिसांनी जप्त केले. मारेकरी हा रिक्षाचालक असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण
घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रक्ताचे डाग, ताट, तांब्या आणि ग्लासवरील बोटाच्या ठशांचे नमुने तज्ज्ञांनी घेतले. शिवाय सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतास अपघात विभागात दाखल करणाºया शेख इस्माईल यांची चौकशी सुरू केली.
दोन दिवसांपूर्वी
झाला वाद
सीमा बेगम या दीड ते दोन महिन्यांपासून रोहिला कॉलनीत घर भाड्याने घेऊन राहत. तेथे अकील यांचे येणे-जाणे होते. दोन ते तीन दिवसांपूर्वी तेथे दहा ते पंधरा जण आले होते आणि त्यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचा आणि आजच्या घटनेचा काही संबंध आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Blood in Rohilla Galli of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.