ब्राह्मणांना हवे संरक्षण, रोजगार; पुरोहितांना मानधन आणि आर्थिक विकास महामंडळ

By Admin | Published: September 23, 2014 01:26 AM2014-09-23T01:26:53+5:302014-09-23T01:38:53+5:30

औरंगाबाद : ब्राह्मण महिलांना डीएमआयसीत रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, युवकांना उच्च शिक्षणात सवलती द्याव्यात, उद्योग उभारणीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,

Brahmins need protection, employment; Monks and financial development corporations to the priests | ब्राह्मणांना हवे संरक्षण, रोजगार; पुरोहितांना मानधन आणि आर्थिक विकास महामंडळ

ब्राह्मणांना हवे संरक्षण, रोजगार; पुरोहितांना मानधन आणि आर्थिक विकास महामंडळ

googlenewsNext


औरंगाबाद : ब्राह्मण महिलांना डीएमआयसीत रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, युवकांना उच्च शिक्षणात सवलती द्याव्यात, उद्योग उभारणीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, सर्वांना संरक्षण मिळावे, पुरोहितांना दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, असे विविध मुद्दे ब्रह्मवृंदांनी मेळाव्यात मांडले. या सर्वांचा सकारात्मकतेने विचार करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली.
ब्राह्मण समाजाच्या मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी ब्राह्मण समाजासमोरील समस्या व अडचणींवर साधकबाधक चर्चा झाली. ब्राह्मणांसाठी आर्थिक विकास महामंडळ सुरू करण्यात यावे, अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याने समाजाला संरक्षण मिळावे, असे मुद्दे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष डॉ. संतोष सवई यांनी मांडले. त्यावेळी तरुणांनी त्याचे जोरदार समर्थन केले. विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेच्या अनुराधा पुराणिक यांनी डीएमआयसीत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असा मुद्दा मांडला. शैक्षणिक सवलतीचा विचार व्हावा, असे शैलजा मुन्शी यांनी स्पष्ट केले. यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र दर्डा यांनी डीएमआयसी प्रकल्पामुळे पुढील २० वर्षांत औरंगाबाद शहराचे बदलणारे स्वरूप, येथील उद्योगांचे वाढणारे प्रमाण, यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या याची सविस्तर माहिती दिली, तसेच हा प्रकल्प येथे कसा आणला व त्यामागची भूमिका स्पष्ट केली. गेल्या ५ वर्षांत शिक्षणासोबत शहराच्या औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि क्रीडा या सेवा दर्जेदार कशा केल्या जातील, याची माहिती दिली.
ज्या शहराची वाढ होते, तिथे अनेक संधी निर्माण होतात आणि संधी निर्माण झाल्या की, त्यासोबत अनेक आव्हानेदेखील समोर उभी राहतात. ही आव्हाने पेलण्याची ताकद ज्यामध्ये असते, तो अनेक संकटांचा सामना करीत यशस्वी होतो. ब्राह्मण समाजाने नेहमीच आव्हाने पेलली आहेत. त्यामुळेच हा कर्तृत्ववान समाज म्हणून ओळखला जातो, असे प्रतिपादन राजेंद्र दर्डा यांनी केले.
या मेळाव्याच्या निमित्ताने ब्राह्मण अधिवेशनानंतर पहिल्यांदाच सर्वप्रांतीय ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने एकत्र आला हेच या मेळाव्याचे फलित ठरले, असे विचार विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
मेळाव्यात वे.शा.सं. दुर्गादास मुळे, सुनील अत्रे गुरुजी, बहुभाषिक ब्राह्मण संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय सुभेदार, शरद कुलकर्णी, महेश गुळवेलकर, अनुराधा पुराणिक, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अनिल मुळे, वे.शा.सं. जीवनगुरू भोगावकर, विजय पाटणूरकर, शैलजा मुन्शी, जिल्हा कण्व ब्राह्मण समाजाचे धनंजय पांडे, अरविंद भगूरकर, सतीश न्यायाधीश, दीपक खेळगावकर, अ‍ॅड. ज्योती पत्की, पुरुषोत्तम भाले, धनंजय कुलकर्णी, विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेचे शरद बाविस्कर, कुमार कुलकर्णी, रमेश पाथ्रीकर, प्रकाश वझरकर, दत्ता देशपांडे, विजय श्रीकांत, रमेश बाविस्कर, शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण सभेचे मुरलीधर कापरे, ब्राह्मण युवक मंडळाचे अनिल पैठणकर, जागरूक ब्राह्मण युवा मंचचे सचिन देशपांडे, अमृतेश्वर व्यवहारे, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे सुभाष बिंदू, राजस्थानी वि.प्र. समाजाचे अध्यक्ष श्रीकृष्ण जोशी, आर.बी. शर्मा तसेच उपेंद्र जोशी, अनिकेत थारेवाल, सतीश कुलकर्णी, सीमा वैद्य, अरविंद उपाध्याय, स्वप्नील कमलाकर, रूपांतरण एकात्मिक युवा प्रतिष्ठानचे आशिष सुरडकर, श्रीपाद जोशी, मंदार जोशी, चिन्मय शिरोडकर, मयूर खैरनार, श्रीकृष्ण शास्त्री, अनिरुद्ध नाईक, नीलेश महाजन, सुनील महाजन, दत्ता कुलकर्णी, वैभव पाठक, अविनाश जोशी, सार्थक खुल्लोडकर, गणेश शास्त्री, दिनेश कुलकर्णी, संगीता गीते, डॉ. मनीषा जोशी, श्रीकांत रामदासी, प्रवीण शर्मा, अशोक कुलकर्णी, श्रीनिवास लिंगदे, नारायण डवाळकर, अलका खडके, अश्विनी मुळे, माधव चारठाणकर, नारायण देशपांडे, क्षितिज लालसरे, रवींद्र भाले, दिनेश पारीक, श्रीकिरण पारीक, शुभदा ब्रह्मपुरीकर, सूर्यकांत रत्नपारखी, सचिन भालेराव, सुहास जोशी, बाळकृष्ण विरेश्वर, मनोहर देशपांडे, प्रकाशराव जातेगावकर, वैशाली कुर्तडीकर, सूर्यकांत नाईक, वैशाली नाईक यांच्यासह शेकडो ब्रह्मवृंद हजर होता.

Web Title: Brahmins need protection, employment; Monks and financial development corporations to the priests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.