औरंगाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:16 AM2018-07-20T00:16:33+5:302018-07-20T00:17:25+5:30
दूध दरवाढ आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दूध दरवाढ आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
पिशोर येथे दूध रस्त्यावर
पिशोर : दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाच रुपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी पिशोर येथील शेतकºयानी ज्ञानेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर दूध ओतून या आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी शफेपूर सोसायटीचे चेअरमन नारायण हरणकाळ, काकासाहेब जाधव, कृष्ण डहाके, प्रभू भोरकडे, संजय नवले, सुभाष भोरकडे, युसूफ शेख, लक्ष्मण जाधव, जनार्दन निकम, विलास दहेतकर यांच्यासह शेतकरी व दूध उत्पादक मोठ्या संख़्येने उपस्थित होते.
बनकिन्होळा येथे सरकारचा निषेध
बनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह भायगाव, बाभूळगाव बु. वरखेडी येथील शेतकºयांनी गुरुवारी औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बनकिन्होळा बसस्थानकावर सकाळी ९ वाजता दुधाची वाहतूक करणारा टेम्पो अडवून त्या टेम्पोमधील दुधाच्या कॅन रस्त्यावर सांडल्या व शासनाच्या धोरणांचा निषेध केला.
यावेळी रामचंद्र फरकाडे, ज्ञानेश्वर दामले, संदीप फरकाडे, सचिन जाधव, राहुल फरकाडे, ज्ञानेश्वर भगत, गजानन फलके, अशोक पाटील, संतोष वाहटुळे, ज्ञानेश्वर सुलताने, बन्सी फरकाडे, लक्ष्मण फरकाडे, विश्वनाथ फरकाडे, वैभव फरकाडे, गुड्डू फरकाडे, जनार्दन फरकाडे, योगेश फरकाडे, कैलास फरकाडे, बापूराव फलके, अंकुश फरकाडे, रघुनाथ फरकाडे, भारत फलके यांच्यासह इतर शेतकरी व दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
ढोरेगावात मोठा बंदोबस्त
गंगापूर : औरंगाबाद -अहमदनगर महामार्गावरील ढोरेगाव येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता नायब तहसीलदार बालचंद तेजीनकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले. यावेळी स्वभिमानीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळुंके, तालुकाध्यक्ष संपत रोडगे, अरुण रोडगे, भाऊसाहेब शेळके, राष्ट्रवादीचे वाल्मीक शिरसाट, संतोष जाधव, स्वभिमानीचे गुलाम अली, अब्दुल रऊफ, विजय वैद्य, शिवसेनाचे भास्कर रोडगे, शारुक पटेल, दिलीप शिंदे, प्रताप साळुंके, सतीश चव्हाण, सुधीर बारे, सोमनाथ चव्हाण, संजय बोबडे, श्रीमंत फोलाने, सुनील खुडसाने, दीपक कानडे, भाऊसाहेब वैद्य यांच्यासह शेतकरी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या नियंत्रणाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सिल्लोडनजीक बैलगाडीसह शेतकरी सहभागी
सिल्लोड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सकाळी साडेदहा वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या देवगिरी दूध डेअरीच्या मुख्य दरवाजाजवळ जिल्हाध्यक्ष मारुती वराडे, सुनील सनान्से यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात बैलगाडीसह चक्का जाम आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार कुलकर्णी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी सतीश कळम, संदीप पांढरे, समाधान कळम, गणेश कळम, योगेश कळम, सुनील कळम, सोनाजी शिंदे, दीपक फोलाने, सुभाष कळम, संतोष काकडे, मंगेश कळम, सोमीनाथ साखळे, दादाराव दिडोरे, संपत वराडे, सोमिनाथ वराडे, कृष्णा काकडे, असंख्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दहेगावजवळ वाहने थांबवून आंदोलन
वैजापूर : सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावरील दहेगाव (शेड फाटा) जवळ वाहने थांबवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळुंके, तालुकाध्यक्ष सीताराम उगले, सचिव अंबादास मांडवगड, भीमराज बरबडे, करण राजपूत, योगेश उगले, विष्णू उगले, विजय उगले, बाबासाहेब काकडे, शफीक शेख, पवन त्रिभुवन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाला काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिगंबर वाघचौरे आणि राष्ट्रवादीचे तुकाराम उगले यांनी पाठिंबा दिला. वैजापूर ठाण्याचे सपोनि. रामहरी जाधव, पोलीस नाईक संजय घुगे, मोइज बेग, सचिन सोनार, कुलकर्णी, जालिंदर तमनार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.