वाचविण्यासाठी गेलेल्या मातेचा मुलासह मृत्यू
By Admin | Published: November 16, 2016 12:15 AM2016-11-16T00:15:09+5:302016-11-16T00:14:41+5:30
केदारखेडा : नळणी समर्थनगर येथे विहिरीत पडलेल्या आपल्या मुलाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या मातेचा मुलासह मृत्यू झाला.
केदारखेडा : नळणी समर्थनगर येथे विहिरीत पडलेल्या आपल्या मुलाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या मातेचा मुलासह मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली़
यात पृथ्वीराज (दीड वर्षे) व सुनीता सतीश वराडे (२४) या मायलेकाचा मृत्यू झाला. आहे़ सुनीता वराडे या दीड वर्षाच्या पृथ्वीराजला घेऊन कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या़ वेचणीच्या कामात व्यस्त असतानाच पृथ्वीराज खेळत असताना शेतातीलच विहिरीत पडला़
हा प्रकार सुनीता यांच्या लक्षात आला़ त्यांनी आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून मुलाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली़
मात्र, या घटनेत मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला़ विहिरीला कठडे नसल्याने मुलगा त्या विहिरीत पडला असल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले़ ही घटना दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली.
सुनीता या शेतात एकट्याच मुलासह गेल्या होत्या. त्यांचे पती घरीच होते. त्या घरी न परतल्याने त्यांनी शोध घेतला. तेव्हा त्यांना या घटनेची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनास्थळी जात त्यांनी दोघांचे मृतदेह विहिरातून बाहेर काढले. रात्री उशिरा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)