नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या उपकुलसचिव मंझा यांना औरंगाबादेत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:57 PM2018-02-20T15:57:19+5:302018-02-20T15:59:02+5:30

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक आणि धनादेश अनादर प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांना अटक करण्यात आली.

deputy secretary Manjha arrested in cheating case at aurangabad | नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या उपकुलसचिव मंझा यांना औरंगाबादेत अटक

नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या उपकुलसचिव मंझा यांना औरंगाबादेत अटक

googlenewsNext

औरंगाबाद : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक आणि धनादेश अनादर प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांना अटक करण्यात आली. सोमवारी रात्री आर्थिक गुन्हेशाखेने ही कारवाई केली.

या बाबत अधिक माहिती अशी कि, डॉ. ईश्वर मंझा हे सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात उपकुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. ऑक्टोबर २०१५ साली औरंगाबाद येथे विद्यापीठात कार्यरत असताना त्यांनी देवराव चव्हाण यांना माझ्या ओळखीने तुमच्या भावाला महाविद्यालयात कारकुनाची नोकरी लाऊन देतो असे आमिष ते ६ लाख रुपयाची मागणी केली. चव्हाण यांनी लागलीच एवढे पैसे नसल्याने सुरुवातीला ३ लाख रुपये मंझा यांना दिले. उर्वरित रक्कम नोकरीची ऑर्डर मिळाल्यास देण्याचे या दरम्यान ठरले. मात्र, तीन महिन्याच्या कालावधी उलटला तरी नोकरीची ऑर्डर न मिळाल्याने चव्हाण यांनी जानेवारी २०१६ मध्ये मंझा यांची भेट घेऊन त्यांना या बाबत विचारणा केली. या वेळी मंझा यांनी त्यांना थोडे दिवस थांबण्यास सांगितले. काही दिवसानंतर मंझा यांचा काहीच प्रतिसाद नसल्याने चव्हाण यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

यानंतर चव्हाण यांनी मंझा यांच्याकडे दिलेल्या पैस्यांची वारंवार मागणी केली. तेव्हा मंझा यांनी त्यांना दोन वेळेस धनादेश दिले मात्र दोन्ही वेळेस ते वटले नाही. यामुळे चव्हाण यांनी याची तक्रार थेट पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना केली. यानंतर या प्रकरणी छावणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, पोहेकॉ. अरुण वाघ, पोलीस शिपाई योगेश तळवंदे, मनोज उईके, दादासाहेब झारगड, महेश उगले, सचिन संपाळ, विनोद खरात यांनी मंझा यांना इटखेडा येथून अटक केले. ही कारवाई पोलीस उपआयुक्त दिपाली धाटे- घाटगे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

Web Title: deputy secretary Manjha arrested in cheating case at aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.