पंतप्रधान आवास योजनेत लवकरच डीपीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:35 AM2017-11-06T00:35:08+5:302017-11-06T00:35:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल म्हणून २०१५ मध्ये घरकुल योजना जाहीर केली. औरंगाबाद शहरातील तब्बल ७० हजारांहून अधिक नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. मागील दीड वर्षांपासून लाभार्थी योजनेचे काय झाले, यासाठी मनपाकडे टक लावून बघत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल म्हणून २०१५ मध्ये घरकुल योजना जाहीर केली. औरंगाबाद शहरातील तब्बल ७० हजारांहून अधिक नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. मागील दीड वर्षांपासून लाभार्थी योजनेचे काय झाले, यासाठी मनपाकडे टक लावून बघत आहेत. मनपा प्रशासनाने योजना राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच हा आराखडा राज्य शासनामार्फत केंद्राकडे पाठविण्यात येईल. डिसेंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक नागरिकाकडे २०२२ पर्यंत स्वत:चे पक्के घर असावे, या हेतूने प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. या योजनेत लाभार्थींना २ ते २.५० लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचीमध्ये चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यात नोटीफाईड झोपडपट्ट्यांचा आहे तिथेच पुनर्विकास करणे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरांची निर्मिती, खासगी, भागीदारीद्वारे घरांची निर्मिती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान आदींचा समावेश आहे. औरंगाबाद शहरात योजना राबविण्याचे दायित्व महापालिकेवर सोपविण्यात आले आहे. महापालिका सत्ताधाºयांनी मोठा गाजावाजा करून योजनेचे उद्घाटन केले. सर्वसामान्य गरीब नागरिकांनी घर मिळेल या आशेवर आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. अर्ज करण्यासाठी नागरिकांनी हजारो रुपये खर्च केले. महापालिकेकडे तब्बल ७० हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले.