बँकांमध्ये रेटारेटी कायम, नोटांची टंचाई कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2016 12:37 AM2016-11-17T00:37:44+5:302016-11-17T00:47:47+5:30
जालना : शहरासोबतच संपूर्ण जिल्ह्यातील बँकांमध्ये नोटांसाठी रेटारेटी कायम आहे
जालना : शहरासोबतच संपूर्ण जिल्ह्यातील बँकांमध्ये नोटांसाठी रेटारेटी कायम आहे. रांगा लावूनही नोटा मिळतीलच याची शाश्वती नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील सर्वच बँकांमध्ये पुरशा नोटा नसल्याने नागरिकांना दोन ते तीन हजार रूपयांच्या रकमेवरच समाधान मानावे लागत आहे.
बुधवारी बँकांमध्ये नोटा जमा करून नवीन नोटा घेणाऱ्यांच्या बोटावर शाई लावण्यात येत आहे. यामुळे एक व्यक्ती पुन्हा येऊ नये असे त्या मागचे कारण असल्याचे बँक अधिकारी सांगत आहेत.
जुन्या नोटांच्या तुलनेत नवीन नोटांची कमतरता आहे. काही बँकांमध्ये दोन हजारासंसोबतच पाचशेऐवजी शंभर नोटा दिल्या जात आहे.
पाचशे रूपयांच्या नोटांची उपलब्धता कमी असल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जुना जालना भागातील बँक आॅफ महाराष्ट्र ,हैदराबाद बँकांसमोर दुपारी चार वाजेपर्यंत मोठी गर्दी होती. मात्र बँकांमध्ये नोटांची टंचाई असल्याने अनेकांना जुन्या नोटाच जमा कराव्या लागल्या. नवीन नोटा मिळू शकल्या नाहीत.
नवीन जालना भागातील बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी, सेंट्रल बँक, स्टेट बँक इ. विविध बँकांसमोर नागरिकांच्या रांगा कायम होत्या. (प्रतिनिधी)