बिबट्या पडला विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:35 AM2018-08-02T00:35:37+5:302018-08-02T00:36:24+5:30
येथून जवळच असलेल्या दिवशी शिवारातील एका विहिरीत बुधवारी सायंकाळी सात वाजता बिबट्या पडल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. वन विभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल दोन तासाने एक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला. विहिरीत डरकाळ्या फोडणाऱ्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
लासूर स्टेशन: येथून जवळच असलेल्या दिवशी शिवारातील एका विहिरीत बुधवारी सायंकाळी सात वाजता बिबट्या पडल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. वन विभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल दोन तासाने एक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला. विहिरीत डरकाळ्या फोडणाऱ्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
येथून जवळच असलेल्या दिवशी शिवारात सजन फुलसिंग जंघाळे यांच्या गट नं. ६४ मध्ये विहीर असून, त्या विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी त्यांचा मुलगा धनराज हा गेला असता त्याला विहिरीत बिबट्या पडलेला असल्याचे दिसून आले.
माजी सरपंच राजू नैमाणे, धरमसिंग सुलाने, करणसिंग सुलाने, नेहरू जारवाल, जलाल नैमाणे, वाल्मिक नैमाणे, राजू बिमरोट हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत वन विभागाच्या अधिकाºयांना माहिती दिली. त्यानंतर तब्बल दोन तासाने वनरक्षक एकनाथ शिरसाठ हे दाखल झाले. दरम्यान, औरंगाबाद येथून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पिंजरा व इतर साहित्य घेऊन कर्मचारी येत असल्याची माहिती शिरसाठ यांनी रात्री दिली.