‘लोकमत’च चॅम्पियन, विजेतेपदाचा ठोकला चौकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:47 AM2018-01-07T00:47:02+5:302018-01-07T00:47:28+5:30
‘लोकमत’ संघाने इंटरप्रेस क्रिकेट स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखताना शनिवारी एडीसीएच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये सामना संघावर ७ गडी आणि २६ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवताना विजेतेपदाचा चौकार ठोकला. अष्टपैलू कामगिरी करणारा ‘लोकमत’चा यश मोहिते सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
औरंगाबाद : ‘लोकमत’ संघाने इंटरप्रेस क्रिकेट स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखताना शनिवारी एडीसीएच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये सामना संघावर ७ गडी आणि २६ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवताना विजेतेपदाचा चौकार ठोकला. अष्टपैलू कामगिरी करणारा ‘लोकमत’चा यश मोहिते सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
दर्पण दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत नाणेफेक गमावल्यानंतर क्षेत्ररक्षणाचे आमंत्रण मिळणाºया ‘लोकमत’च्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करताना पहिल्या षटकापासूनच सामनाच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले आणि नियमित अंतराने त्यांना तंबूत धाडले. त्यांना क्षेत्ररक्षकांचीही सुरेख साथ लाभली. युवा डावखुरा वेगवान गोलंदाज यश मोहितेने पहिल्याच षटकात गणेश तुळशी यांना बाद करीत ‘लोकमत’ला यश मिळवून दिले. त्यानंतर मिडविकेटला षटकार ठोकणाºया दत्ता भापकरला अरिहंत साकला याने तंबूत धाडले. विशेष म्हणजे अरिहंतला हवेत मारलेला जोरदार फटका लाँगलेगला अशोक कांबळे याने सुरेख टिपताना संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यातच विजय अहिरे याने सामनाचा अष्टपैलू खेळाडू बंडू घुले याला त्रिफळाबाद करीत सामना संघाच्या मोठी धावसंख्या रचण्याच्या आशेला सुरुंग लावला. बंडू घुले बाद झाल्यामुळे सामना संघाला १0 षटकांत ७ बाद ५३ पर्यंतच मजल मारता आली. सामनाकडून दत्ता भापकर याने सर्वाधिक १६ धावा केल्या. ‘लोकमत’कडून विजय भुजाडी याने ३ षटकांत फक्त ६ धावा देत २ गडी बाद केले. यश मोहिते, अरिहंत साकला, विजय अहिरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात सामनाचा गोलंदाज बंडू घुले याला मिडविकेटला सणसणीत षटकार ठोकणाºया यश मोहितेच्या आकर्षक फलंदाजीच्या बळावर लोकमतने विजयी लक्ष्य अवघ्या ५.४ षटकांत ३ फलंदाज गमावून लीलया गाठले. यश मोहितेने शिवाजी वनशेट्टे याचाही समाचार घेताना त्याला मिडविकेटला लागापोठ दोन षटकार ठोकताना लोकमतला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. तो बाद झाल्यानंतर दुर्गेश जोशी (८) आणि सुनील गिºहे यांनी लोकमतच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लोकमतकडून यश मोहिते याने अवघ्या १३ चेंडूंतच ३ षटकार व एका चौकारासह २८ धावांची झंझावाती खेळी केली. विजय अहिरेने एका चौकारासह १0, तर दुर्गेश जोशीने नाबाद ८ धावा केल्या. तौसिफ खान ५ धावांवर बाद झाला. ‘सामना’कडून शिवाजी वनशेट्टे याने १३ धावांत २, तर विवेक जहागीरदारने १ गडी बाद केला.
विजेतेपद पटकावणारा ‘लोकमत’चा संघ
विकास राऊत (कर्णधार), राम शिनगारे (उपकर्णधार), दुर्गेश जोशी, विजय भुजाडी, विजय अहिरे, यश मोहिते, बापू सोळुंके, तौसिफ खान, सुनील गिºहे, अशोक कांबळे, जयंत रुद्रेश्वर, शिरीष घायाळ, गोरखनाथ करंगळे, सचिन लहाने, अरिहंत सांकला, देवेंद्र सदावर्ती. प्रशिक्षक : जयंत कुलकर्णी, के. राघवेंद्र.
सर्वोत्तम खेळाडू
सामनावीर : यश मोहिते.
गोलंदाज : अरिहंत सांकला
फलंदाज : अराफत पटेल
क्षेत्ररक्षक : आशिष चौधरी