ऊसदरासाठी माजलगाव शहर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:01 AM2017-11-05T01:01:05+5:302017-11-05T01:01:16+5:30
कारखाने सुरु होऊनही ऊस दराबाबात भूमिका स्पष्ट केलेली नाही. याविरोधात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलने केली. या अंतर्गत शनिवारी माजलगाव बंदचे आवाहन केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : कारखाने सुरु होऊनही ऊस दराबाबात भूमिका स्पष्ट केलेली नाही. याविरोधात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलने केली. या अंतर्गत शनिवारी माजलगाव बंदचे आवाहन केले होते.
गळीत हंगाम सुरु होऊन देखील कारखान्यांनी उसाचा भाव जाहीर केलेला नाही. तसेच गेल्यावर्षी कारखान्यांना दिलेल्या उसाच्या फरकाची सुमारे ६०० रूपये रक्कम टनाप्रमाणे शेतक-यांना सहकारी साखर कारखान्यांनी दिली नाही. पीकविमा बँक खात्यावर जमा झालेला असताना तसेच ऐन दिवाळीच्या काळात त्यांची शेतक-यांची गरज असताना देखील जिल्हा बँक बंद ठेवून शेतकºयांची दिवाळी कडू केली. या विरोधात शेतकरी संघर्ष समितीचे विविध प्रकारची आंदोलने मागील आठ-दहा दिवसांपासून सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी माजलगाव बंदचे आवाहन केले होते. सकाळपासुनच शहरातील व्यापारपेठ बंद होती, मोंढा, बीडरोड, धारूर रोड आदी भागातील व्यापाºयांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.