मनीषाचे एव्हरेस्टच्या दिशेने मार्गक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:23 AM2018-05-19T00:23:23+5:302018-05-19T00:24:08+5:30
मराठवाड्याची आंतरराष्ट्रीय महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिचे जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे शिखर माऊंट एव्हरेस्टच्या दिशेने यशस्वीपणे मार्गक्रमण सुरू आहे. इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट असणाऱ्या मनीषा वाघमारे हिने १९ हजार ५०० फूट उंचीवर असणाºया कॅम्प १ वरून शुक्रवारी कॅम्प २ पर्यंत मजल मारली आहे. आज रात्री २ ते ३ च्या सुमारास मनीषा ८ हजार ८४० मीटर उंचीवर असणाºया एव्हरेस्ट शिखराच्या कॅम्प ३ कडे कूच करणार आहे.
औरंगाबाद : मराठवाड्याची आंतरराष्ट्रीय महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिचे जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे शिखर माऊंट एव्हरेस्टच्या दिशेने यशस्वीपणे मार्गक्रमण सुरू आहे. इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट असणाऱ्या मनीषा वाघमारे हिने १९ हजार ५०० फूट उंचीवर असणाºया कॅम्प १ वरून शुक्रवारी कॅम्प २ पर्यंत मजल मारली आहे. आज रात्री २ ते ३ च्या सुमारास मनीषा ८ हजार ८४० मीटर उंचीवर असणाºया एव्हरेस्ट शिखराच्या कॅम्प ३ कडे कूच करणार आहे.
या वर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनीषाने १७ मे रोजी रात्री एक वाजता बेस कॅम्पवरून एव्हरेस्ट शिखराच्या कॅम्प १ कडे कूच केली होती. २० रोजी एव्हरेस्टच्या कॅम्प ४ वर पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान अनुकूल असल्यास ती २० मे रोजीच जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्यासाठी निघणार असून ती २१ रोजी सकाळी एव्हरेस्टच्या सागरमाथ्यावर असेल अशी शक्यता आहे.
गतवर्षी निसर्गाने रौद्ररूप धारण केल्यामुळे मनीषा वाघमारे एव्हरेस्ट सर करण्यापासून अवघ्या १७० मीटरपासून वंचित राहिली होती; परंतु या वर्षी नव्या उमेदीने व जिद्दीने ती ४ एप्रिल रोजी एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना झाली होती. त्याच दिवशी ती काठमांडू येथे पोहोचली होती. त्यानंतर तेथील हवामानाशी जुळवून घेण्यासाठी तिने ४५ दिवसांच्या कालावधीत कालापथ्थर, पमोरी हाय कॅम्प तसेच २८ एप्रिल ते १ मेदरम्यान तिने बेस कॅम्प ते कॅम्प १, कॅम्प २ आणि कॅम्प ३ असे रोटेशन्स केले होते.