वैद्यकीय शिक्षण सहसंचालक लहाने यांच्याकडून घाटी रुग्णालयाच्या पाहणीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:54 AM2018-05-25T11:54:26+5:302018-05-25T11:57:20+5:30
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी आज घाटी रुग्णालयात पाहणी केली.
औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी आज सकाळी घाटी रुग्णालयात पाहणीस सुरुवात केली.
डॉ. लहाने यांनी बाह्यरुग्ण विभागातील नेत्र विभागापासून पाहणीला सुरुवात केली. नेत्र, क्ष - किरण , शल्यचिकित्सा आदी विभागांची त्यांनी पाहणी केली. यावेळी विविध सुविधांच्या स्थितीचा त्यांनी आढावा घेतला. तसेच काही रुग्णांशी संवाद साधला.
डॉ . लहाने पाहणीसाठी येणार असल्याने घाटी रुग्णालय प्रशासनाने सकाळपासूनच स्वच्छतेसह विविध खबरदारी घेण्यावर भर दिला. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे,प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. यू. झिने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक,डॉ.मंगला बोरकर, डॉ. राहूल पांढरे आदी उपस्थित होते