दूध उत्पादक संघ नफ्यात

By Admin | Published: September 8, 2015 12:15 AM2015-09-08T00:15:22+5:302015-09-08T00:36:17+5:30

औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अधिमंडळाची २०१४-१५ या आर्थिक वर्षाची सभा आज पाटीदार भवनात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

Milk Producing Team Profit | दूध उत्पादक संघ नफ्यात

दूध उत्पादक संघ नफ्यात

googlenewsNext


औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अधिमंडळाची २०१४-१५ या आर्थिक वर्षाची सभा आज पाटीदार भवनात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. त्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दूध संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे अध्यक्षस्थानी होते. २०१०-११ पासून दूध उत्पादक संघ सतत वाढत्या नफ्यात आहे. यंदाचा नफा ९२ लाखांवर जाऊन पोहोचला आहे.
दूध उत्पादकांना प्रतिलिटर ४० पैसे भावफरक देण्यात येणार आहे. ही रक्कम एक कोटी पाच लाख रु. इतकी होते. तसेच चारा बियाणास ५० टक्के सबसिडी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. दुष्काळी परिस्थिती पाहता दूध संघाच्या संचालकांनी एक वर्षभर भत्ते न घेण्याचेही ठरविले आहे. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दहा हजारांची मदत करण्याचे ठरविण्यात आले. दूध उत्पादक संघाच्या १४२ कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. संघाच्या कारकीर्दीत ही घटना प्रथमत:च घडल्याने कर्मचारीवर्ग खुश झाला आहे.
दूध पुरवठा करणाऱ्या चांगल्या संस्थांचा व दूध विक्रेत्यांचा यावेळी रोख बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. दूध उत्पादक संघाला सहकारभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व आयएसओ दर्जा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
सुमारे दोन हजार जणांची यावेळी उपस्थिती होती. उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी आभार मानले. कचरूडिके, राजेंद्र जैस्वाल, गोकुळसिंग राजपूत, राजेंद्र पाथ्रीकर, दिलीप निरफळे, कुशीवर्ताबाई बडक, शीलाताई कोळगे, हिराबाई सोटम, सविता अधाने, पुंडलिक काजे, प्रभाकर सुरडकर, माजी संचालक रमेश डोणगावकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील, काकासाहेब कोळगे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Milk Producing Team Profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.