धम्माचल येथे शनिवारी धम्म परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:18 AM2017-11-03T01:18:39+5:302017-11-03T01:18:51+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट आॅफ पाली अँड बुद्धिझमच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही अजिंठा लेणीलगत ‘धम्माचल’ येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद तसेच संथागार व भिक्खू निवासाचे उद्घाटन शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट आॅफ पाली अँड बुद्धिझमच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही अजिंठा लेणीलगत ‘धम्माचल’ येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद तसेच संथागार व भिक्खू निवासाचे उद्घाटन शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी १० वा. भदन्त शरणानंद महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते संथागार व भिक्खू निवासाचे उद्घाटन होईल. त्यानंतर सकाळी ११.३० वा. भदन्त डॉ. एन. आनंद महाथेरो यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणार
आहे. अध्यक्षस्थानी भदन्त धम्मसेवक महाथेरो असतील. इंग्लंड येथील भदन्त चंद्रबोधी महाथेरो यांच्या हस्ते धम्माचल स्मरणिकेचे प्रकाशन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भिक्खू संघाची धम्मदेशना होईल.
या धम्म परिषदेत भदन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महाथेरो,भदन्त शरणानंद महाथेरो, भदन्त आनंदबोधी महाथेरो,भदन्त करुणानंद महाथेरो,भदन्त एस. काश्यपायन महाथेरो,भदन्त डॉ. एम. सत्यपाल थेरो, भदन्त ज्ञानरक्षित आदी भिक्खूंसह खा. रावसाहेब दानवे, खा. डॉ. सुनील गायकवाड, आ. अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट, विभागीय आयुक्त डॉ. पुुरुषोत्तम भापकर, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आदी मान्यवरांसह राज्यभरातून उपासक- उपासिका सहभागी होणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी सांगितले.
परिषदेसाठी आर. के. गायकवाड, उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळके, डॉ. डी. के. गायकवाड, सु. ल. जाधव, डॉ. जी. के. डोंगरगावकर, बी. के. अदमाने, दत्तात्रय गवळे, डॉ. वैशाली प्रधान, डॉ. अभिजित वाडेकर, डॉ. किशोर साळवे परिश्रम घेत आहेत.