वैज्ञानिक प्रयोगांची ‘इन्स्पायर’मध्ये धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:29 AM2017-11-24T00:29:52+5:302017-11-24T00:30:20+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आयोजित ‘इन्स्पायर सायन्स कॅम्प’मध्ये शालेय विद्यार्थ्यांसमोर वैज्ञानिक प्रयोगांची धमाल करण्यात आली. सूक्ष्म निरीक्षणावर आधारित आणि दैनंदिन सृष्टीचक्राचे वस्तुनिष्ठ आकलन होण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगातून माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आयोजित ‘इन्स्पायर सायन्स कॅम्प’मध्ये शालेय विद्यार्थ्यांसमोर वैज्ञानिक प्रयोगांची धमाल करण्यात आली. सूक्ष्म निरीक्षणावर आधारित आणि दैनंदिन सृष्टीचक्राचे वस्तुनिष्ठ आकलन होण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगातून माहिती देण्यात आली.
विद्यापीठातील पॉल हर्बट सेंटर फॉर डी. एम. ए. बारकोडिंग आणि बायोडायव्हर्सिटी आणि भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे इन्स्पायर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये बुधवारी शालेय विद्यार्थ्यांसमोर विविध प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. पहिल्या सत्रात बायोडायव्हर्सिटीचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही गुणपत्रकांवर मिळणाºया मार्कांत नसून, ज्ञानाच्या समाजासाठीच्या उपयुक्ततेत आहे. सृष्टीचे कुतूहल, सूक्ष्म निरीक्षण, विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती या विज्ञानाच्या प्रगतीतील मूलभूत बाबी आहेत. यासाठी त्यांनी शास्त्रज्ञ आइन्स्टाइन, न्यूटन, आर्किमिडीज, आर्यभट्ट, सी. व्ही. रमण आदींच्या जीवनातील उदाहरणाद्वारे या बाबी स्पष्ट करुन सांगितल्या. दुसºया सत्रात गुजरातमधील अंकुर हॉबी सेंटरचे संचालक डॉ. धनंजय रावल यांनी दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञानातील सिद्धांतांचे सोप्या भाषेत प्रात्यक्षिकांच्या आधारे सादरीकरण केले. चुंबक- धातूू, धातू आणि चुंबक- चुंबक ही वैज्ञानिक संज्ञा ओळखण्याच्या सोप्या कसोट्या विद्यार्थ्यांसमोर प्रयोगाद्वारे मांडल्या. केंद्रीय वस्तुमानावर आधारित प्लास्टिकची चीप, कातडी बेल्ट यांचा प्रयोग सादर केला. कागदी विमानाद्वारे खºया विमानोड्डाणाचे तत्त्व विद्यार्थ्यांना उलगडून दाखवले. प्रयोगाचे सादरीकरण करण्यासाठी कॅॅम्पचे कार्यवाहक दिनेश नलगे, राहुल सूर्यवंशी, अतुल कदम, शरद रोडे, पूजा एखंडे, वर्षा चालक, रोहित पाटील, दीपक ठोंबरे, डॉ. अनिल सरकटे, डॉ. तेजस्विनी सोनटक्के, डॉ. अनिता टिकनाईक, डॉ. राजश्री देवळालीकर, डॉ. गुणवती आरक, दीपाली सांगळे, अंजली ताटे, सुजाता गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.