नमामी गोदे उपक्रमाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:22 AM2017-09-26T00:22:12+5:302017-09-26T00:22:12+5:30

नदी ही आपली जीवनदायिनी असून तिचे संवर्धन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे ही भावना जागृत करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विकासार्थ विद्यार्थीने आयोजित केलेल्या नमामी गोदे उपक्रमाला सोमवारी बंदाघाट येथे सुरुवात करण्यात आली़ यावेळी हजारो नांदेडकरांनी मानवी साखळी तयार करुन गोदेची सामूहिक आरती केली़

The start of the Namami docks initiative | नमामी गोदे उपक्रमाला सुरुवात

नमामी गोदे उपक्रमाला सुरुवात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नदी ही आपली जीवनदायिनी असून तिचे संवर्धन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे ही भावना जागृत करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विकासार्थ विद्यार्थीने आयोजित केलेल्या नमामी गोदे उपक्रमाला सोमवारी बंदाघाट येथे सुरुवात करण्यात आली़ यावेळी हजारो नांदेडकरांनी मानवी साखळी तयार करुन गोदेची सामूहिक आरती केली़
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदरसिंघजी यांचे प्रतिनिधी बाबा पालसिंघजी, प्रमुख वक्ते विकासार्थ विद्यार्थीचे प्रांत निमंत्रक इशान गणपुले , अभाविप महानगर अध्यक्षा प्रा.डॉ.सौ.गीता सांगवीकर, गणेश बोडके यांची उपस्थिती होती़ यावेळी इशान गणपुले म्हणाले, विकासार्थ विद्यार्थी पर्यावरणविषयक कार्यक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांच्या मनामधे पर्यावरणाची जाणीव व्हावी व पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमधे प्रेम निर्माण व्हावे, हा विकासार्थ विद्यार्थ्याचा मानस आहे. आज गोदावरी व तिच्या आसपासचा परिसर घाणीने भरलेला आहे़ गोदावरीत ड्रेनेजचे नाले सोडण्यात आले आहेत़ हे चित्र बदलण्यासाठी नमामी गोदे हा उपक्रम अभाविपने हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गोदावरी उगम ते शेवट असे सर्वेक्षण केले जाणार आहे. या उपक्रमामधून जी माहिती गोळा होईल ती माहिती केंद्राकडे पाठवून नमामी गंगेच्या धर्तीवर केंद्राने नमामी गोदे हा उपक्रम सुरु करावा असा प्रयत्न केला जाईल असे सांगितले़ यावेळी नागरिकांनी गोदावरीची मंत्रोच्चारात ढोल- ताशांच्या गजरात महाआरती केली़ तसेच गोदावरीच्या संवर्धन व संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याची शपथ घेतली. यावेळी शिवरुद्रा व केसरी ढोल-ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले़
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभाविपचे शिवकुमार पत्रे, गंगाधर कोलमवार, गणेश बोडके, यज्ञेश पांडे , गगन येमेकर, प्रसाद जाधव, चिन्मय बासवाडेकर, जनार्दन जाधव, सिद्धेश्वर तिके, भीमाशंकर कुलकर्णी , अभिजीत पांडे, कृष्णा बंगीनवर, अमरदीप वायगावकर, भाग्यश्री श्रीभाते यांनी परिश्रम घेतले़

Web Title: The start of the Namami docks initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.