दहा बालकांना हृदयविकार
By Admin | Published: March 18, 2017 12:03 AM2017-03-18T00:03:49+5:302017-03-18T00:08:01+5:30
उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २५० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैैकी दहा बालकांना हृदयविकार असल्याचे समोर आले आहे.
उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २५० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैैकी दहा बालकांना हृदयविकार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सदरील दहा बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयातील गुरूवारी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्र्यक्रमांतर्गत विविध आजाराने त्रस्त असलेल्या २५० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैैकी १८ बालकांना दृष्टिदोष असल्याचे आढळून आले. हाडांच्या आजाराने त्रस्त असलेल्या ४४ बालकांच्या आरोग्य तपासणीतून २० बालकांची जीभ चिकटणे, ऐकू कमी येणे, टॉन्सिल इ. आजार असल्याचे निष्पन्न झाले. तपासणी करण्यात आलेल्या १८ कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनाकरिता जिल्हा रुग्णालयातील ‘डीईआयसी’ या विभागामार्फत वैद्यकीय संदर्भसेवा देण्याचा सल्ला बालरोग तज्ञांनी दिला.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. बालरोग तज्ज्ञ डॉ. विनोद जाधव, डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. कोमल जाधव, डॉ. काळे, डॉ. महावीर कोचेटा यांनी या बालकांची तपासणी केली. शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. मुजीब मोमीन, डॉ. विनिता पंडित, डॉ. एस. टी. राठोड, डॉ. सुहास भोसले, मीरा सातपुते, अश्विनी शिंदे, अश्विनी फंड, गीता महामुनी यांनी परिश्रम घेतले. हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त असलेल्या बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मुंबई, पुणे येथील रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास जाधव यांनी दिली.
(वार्ताहर)