वकिलास धमकी; प्रशासनास निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:56 PM2017-09-29T23:56:47+5:302017-09-29T23:56:47+5:30
येथील जिल्हा वकील संघाचे सदस्य अॅड. अकिल अहेमद हे परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या शमशेरखान पठाण यांच्या कुटुंबियांच्या वतीने न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडत आहेत. मात्र त्यांना आरोपीच्या हितचिंतकाकडून फोनवर जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा वकील संघाचे सदस्य अॅड. अकिल अहेमद हे परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या शमशेरखान पठाण यांच्या कुटुंबियांच्या वतीने न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडत आहेत. मात्र त्यांना आरोपीच्या हितचिंतकाकडून फोनवर जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे अॅड. अकिल अहेमद यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन अॅड. अकिल यांना पोलीस संरक्षण देऊन आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी अॅड. जी. बी. ढाले, एस. जी. राठोड, एस. के. सिरसाट, एन. एस. घुगे, ए. आर. तोष्णीवाल, के. एन कोटकर, डी. जे. पवार आदींची उपस्थिती होती. दरम्यान, उपाध्यक्ष अॅड. सतीश देशमुख यांनी संबंधितास न्यायालयात पक्षकाराची कायदेशीर बाजू मांडतांना अशा प्रकारच्या येणाºया धमक्या व दबावास बळी न पडता पीडितांना न्याय देण्याचे आवाहन केले. तसेच अॅड. अखिल अहेमद यांच्या पाठीशी वकील संघ खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले.