नववर्षानिमित्त हिरो मोटर्सने लाँच केल्या तीन नव्या बाईक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 07:13 PM2017-12-21T19:13:20+5:302017-12-21T19:16:34+5:30
नववर्षानिमित्त टू व्हिलर कंपनी हिरो मोटर्सने तीन नव्या बाईक्स लाँच केल्या आहेत. सुपर स्प्लेंडर, पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रो या बाईक्स हिरो मोटर्सने लाँच केल्या आहेत.
मुंबई - नववर्षानिमित्त टू व्हिलर कंपनी हिरो मोटर्सने तीन नव्या बाईक्स लाँच केल्या आहेत. सुपर स्प्लेंडर, पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रो या बाईक्स हिरो मोटर्सने लाँच केल्या आहेत. नव्या फीचर्ससह या बाईक्स लाँच करण्यात आल्या आहेत. हिरोने नव्या बाईक्समध्ये काही बदल करत पुन्हा मार्केटमध्ये आणल्या आहेत. स्टाईल, इंजिन क्षमता आणि मायलेज हे या बाईक्सचं वैशिष्ट्य आहे. तीनही बाईक वेगवेगळ्या पाच रंगात उपलब्ध आहेत. कंपनीने आपल्या हिरो पॅशन एक्स प्रोचं उत्पादन थांबवलं होतं, मात्र आता नव्या बदलासह या बाईक्स भेटीला येत आहेत.
या तीनही मोटरसायकल कंपनीचं पेटंट असलेल्या इंधन बचतीचं i3s तंत्रज्ञानयुक्त आहेत. त्यामुळे पेट्रोल बचत होऊन, जास्त मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीने बाईक्स लाँच केल्या असल्या तरी त्यांची किंमत जाहीर केलेली नाही. पुढील महिन्यात किंमती जाहीर करण्यात येणार आहेत. सध्याच्या किमतीपेक्षा या बाईक्सच्या किंमती थोड्या जास्त असण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापर्यंत या गाड्या डिलर्सकडे पोहोचतील.
सुपर स्प्लेंडर बाईकमध्ये 124.7 सीसी चं इंजिन असणार आहे. 11.4 ब्रेक हॉर्स पावरची (बीएचपी) क्षमता असणार आहे, आणि 4 गियर असणार आहेत. पॅशन एक्स प्रो बाईकमध्ये 110 सीसी इंजिन असणार आहे. 9.4 ब्रेक हॉर्स पावरची (बीएचपी) इंजिन क्षमता असणार आहे. तर पॅशन प्रोमधअये 97.2 सीसी इंजिन असणार आहे.