Beauty : कॉलेज तरुणींचा असा असावा मेकअप !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2017 08:50 AM2017-07-08T08:50:23+5:302018-06-23T12:04:28+5:30

चला जाणून घेऊया कॉलेजला जाताना तरुणींचा मेकअप कसा असावा.

Beauty: This should be done by college girl! | Beauty : कॉलेज तरुणींचा असा असावा मेकअप !

Beauty : कॉलेज तरुणींचा असा असावा मेकअप !

Next
ong>-Ravindra More
कॉलेज लाइफ सर्वांसाठी खूपच अविस्मरणीय ठरते. अभ्यास, मौजमस्ती, मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये वेळ घालविणे हे सर्व आनंदाचे क्षण असतात. मात्र या बरोबरच कॉलेजमध्ये स्वत:ला स्टायलिश आणि सुंदर दिसणेही तेवढेच महत्त्वाचे असते. बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी कॉलेज तरुणीची भूमिका साकारलेली आहे. यावेळी त्यांचा मेकअप असा असतो की, त्यांचा लुक कॉलेज तरुणींसारखाच दिसतो. पण कॉलेजमध्ये आपला मेकअप जास्त ब्राइट आणि लाउडदेखील नसावा. कॉलेज पार्टी असेल तर ती गोष्ट वेगळी असते. चला जाणून घेऊया कॉलेजला जाताना तरुणींचा मेकअप कसा असावा. 

* फ्लॉलेस लुकसाठी आपणास जास्त मेकअपची गरज नाही. फक्त एक चांगल्या प्रकारची ‘बीबी’ क्रीम किंवा लाइटवेट वॉटर बेस्ड फाउंडेशन लावावे. यामुळे आपली स्कीन सहज श्वास घेऊ शकते आणि पोर्स बंद नाही होणार. शिवाय पिंपल्सदेखील होणार नाहीत.   

* ओठांच्या सौंदर्यासाठी नेहमी ओपन लिप कलरची निवड करा. थंड वातावरणात आपण फक्त लिप ग्लॉसचा वापर करुन आपल्या ओठांना सुंदर लुक देऊ शकता.  

* डोळ्यांच्या सुंदरतेसाठी काजळ आणि मस्काराचा वापर करु शकता. मस्कारामुळे डोळ्यांच्या पापण्या घनदाट दिसण्यासाठी त्याचा एक कोट लावून दोन सेकंदानंतर त्यावर हलकासा टॅल्कम किंवा बेबी पावडर लावा. त्यानंतर मस्काराचा दुसरा कोट लावावा.  

* जर आपणास ब्लश करायला असेल तर लाइट शेडच्या ब्लशची निवड करावी. पीच कलर आपणासाठी परफेक्ट आॅप्शन आहे. यामुळे आपणास नॅच्युरल लुक मिळेल. कॉलेजसाठी ही परफेक्ट शेड आहे.  

* जर आपण डार्क सर्कल्सच्या समस्येने त्रस्त असाल तर कंसीलरची मदत घेऊ शकता. मात्र याचा फक्त एक पातळ थर लावावा. नेहमी आपल्या स्किन टोन पेक्षा एक शेड लाइट कंसीलर खरेदी करा.  

* कॉलेज लाइफ दरम्यान तरुणीचे वय खूपच सेंसिटिव्ह असते. त्यामुळे स्किनमध्ये रॅशेज आणि सनबर्न सारख्या समस्या सहज उद्भवू शकतात. यापासून बचाव करण्यासाठी नेहमी सनस्क्रीनची मदत घ्यावी. कॉलेजमध्ये जाण्याअगोदर याचा नक्की वापर करावा. सनस्क्रीनला टोनिंग आणि मॉइश्चराइजिंगनंतर लावावे.  

Also Read : Beauty Tips : मस्काराच्या विविध रंगांनी बना स्टायलिश !
                   : ​Beauty Tips : ​सुंदर त्वचेसाठी श्रुती हासन वापरते ‘हा’ मास्क !

Web Title: Beauty: This should be done by college girl!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.