Accident: ट्रॅक्टर अन् ट्रकचा विचित्र अपघात, ऊस अंगावर पडून बुलेटवरील दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 07:49 PM2022-05-08T19:49:53+5:302022-05-08T19:57:29+5:30

ट्रकमधील ऊस अंगावर पडल्याने दोनजण जागीच ठार

Accident: Bizarre accident of tractor and trolley in kaij beed, falling on sugarcane and killing two on bullet | Accident: ट्रॅक्टर अन् ट्रकचा विचित्र अपघात, ऊस अंगावर पडून बुलेटवरील दोघे ठार

Accident: ट्रॅक्टर अन् ट्रकचा विचित्र अपघात, ऊस अंगावर पडून बुलेटवरील दोघे ठार

googlenewsNext

बीड/केज - माजलगाव तालुक्याच्या चाडगाव येथील शेतकऱ्याचा ऊस घेऊन येडेश्वरी साखर कारखान्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या ट्रकने भवानी चौकात ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात ट्रक पलटी झाल्याने रस्त्याने दुचाकीवर जाणाऱ्यांच्या अंगावर ट्रकमधील ऊस पडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघेजण उसाखाली दाबून जागीच ठार झाले. सदर घटना आज रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, केज शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम करणाऱ्या एचपीएम कंपनीने शहरातील अर्धवट रस्ते खोदून ठेवल्याने ते अपघाताला करणीभूत ठरत असल्याची चर्चा अपघातानंतर नागरिकांत होत आहे. 

माजलगाव तालुक्यातील चाडगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्याचा तोडलेला ऊस ट्रकचालक हरिभाऊ पांचाळ रा.उमरी ता केज हे ट्रक क्रमांक एम एच ०८ एच ३०८ मधून घेऊन ते धारूर रस्त्याने केज येथील येडेश्वरी साखर कारखान्याकडे निघाले होते. त्यावेळी, ताब्यातील भरधाव वेगातील ट्रक केज शहरातील धारूर अंबाजोगाई रस्त्यावरील भवानी चौकात आल्यानंतर बीड रस्त्याने कारखान्याकडे ऊस घेऊन जात असलेल्या ट्रॅक्ट्ररला ट्रकने धडक दिली. रस्त्याच्या कडेच्या नालीस जाऊन धडकल्याने ट्रक पलटी होवून केज शहरातील अरबाज नासिर खुरेशी (वय २५ वर्ष रा, कुरेशी गल्ली),जुबेर आसेफ शेख(वय २६ वर्ष रा. कोकिचपी)हे दोघेजण अंबाजोगाई रस्त्याकडील पेट्रोल पंपा केज कडून  शहरात बुलेट क्रमांक एम एच १७ बीए ३१३ वर येत असताना त्यांच्या अंगावर ट्रकमधील ऊस पडल्याने उसाखाली दबल्याने ते जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच केज शहरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,प्र. पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे,यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.अपघातग्रस्त ट्रकमधील ऊस जेसीबीच्या व क्रेनच्या साहाय्याने बाजूला करत उसाखाली दाबल्या गेलेल्या दोघांचे प्रेत दोन तास परिश्रम करून काढण्यात आले.अपघातस्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या अपघातामुळे बीड अंबाजोगाई,कळंब व धारूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या चारही बाजूस वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत वाहतूक जॅम झाली होती. दरम्यान, या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. 

अर्धवट खोदलेले रस्त्याने अपघात

धारूरकडून केज शहरात येणारा रास्ता हा उताराचा असल्याने वाहनाचा वेग चालकांना मर्यादित करण्यास कसरत करावी लागते.त्यातच केज अंबाजोगाई धारूर रस्त्यावरील भवानी चौकात रस्त्याचे काम करणाऱ्या एचपीएम कंपनीने रस्त्याचे काम करण्यासाठी रस्ते अर्धवट खोदून ठेवल्याने ते धारूरकडून केज अंबाजोगाईकडे जाणाऱ्या वाहनांना वळण घेण्यास अडथळा येत असल्याने  अपघाताला कारणीभूत ठरत असल्याची चर्चा अपघातानंतर नागरिंकातून होत होती. 

नातेवाईकांची पोलीस ठाण्यात आक्रोश

दरम्यान, अपघातात मयत झालेल्या दोन्ही युवकाचे प्रेत रुग्णवाहिकेतून  नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात आणले आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या एच.पी.एम कंपनीवर व ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात प्रेत ठेवले. त्यामुळे, पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पोलिसांनी जमावास कारवाई करण्याचा इशारा देताच जमाव पांगला व पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दोन्ही युवकाचे प्रेत रुग्णवाहिकेतून केज उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले.
 

Web Title: Accident: Bizarre accident of tractor and trolley in kaij beed, falling on sugarcane and killing two on bullet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.