बीडमध्ये शेत जमिनीसाठी पोराचा बापावर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:39 AM2017-12-14T00:39:40+5:302017-12-14T00:39:43+5:30
‘तुझ्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर का करत नाहीस म्हाताºया’ असे म्हणत पोराने स्वत:च्या बापावर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी बीड तालुक्यातील पाली येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘तुझ्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर का करत नाहीस म्हाताºया’ असे म्हणत पोराने स्वत:च्या बापावर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी बीड तालुक्यातील पाली येथे घडली.
जखमी बापावर सध्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. नारायण धोंडीबा राऊत (८० रा. पाली, ता. बीड) असे या वयोवृद्ध पित्याचे नाव आहे. त्यांना अरुण आणि कैलास अशी दोन मुले आणि एक मुलगी आहे. यापैकी अरुणचा चार वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यांनतर नारायण राऊत हे अरुणच्या मुलांकडेच राहतात.
त्यांच्या नावावर २० एकर जमीन असून चार एकर त्यांनी कैलासच्या नावावर केली आहे. शनिवार दुपारी चार वाजेच्या सुमारास ते गावातील दत्त मंदिराजवळील कैलास याच्या किराणा दुकानासमोर गेले होते. यावेळी कैलासने ‘म्हाताfया, तू तुझ्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर का करत नाहीस आणि तू जमीन माझ्या पुतण्याच्या बायकोच्या नावावर का केलीस’ असे म्हणत वाद घातला.
मी आत्ताच जमीन तुझ्या नावावर करणार नाही असे नारायण राऊत यांनी सांगताच कैलासने त्यांना शिवीगाळ केली आणि दुकानात ठेवलेला कोयता आणून त्यांच्या पोटावर आणि पायावर वार केला. या हल्ल्यात नारायण राउत हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातवांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असे नारायण राऊत यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी कैलास नारायण राऊत याच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.