बीडमध्ये एकाच रात्रीत चार चो-या; लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:31 AM2017-12-20T00:31:12+5:302017-12-20T00:31:17+5:30

बीड शहरातील सारडानगरीत बंद घराचे कुलूप तोडून एक चोरी केली तर दोन ठिकाणी अयशस्वी प्रयत्न झाला. तसेच विद्यानगर भागात एका एलआयसी अधिकाºयाच्या घरी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला.

Four beats in a single night in Beed; Lakhs of millions | बीडमध्ये एकाच रात्रीत चार चो-या; लाखोंचा ऐवज लंपास

बीडमध्ये एकाच रात्रीत चार चो-या; लाखोंचा ऐवज लंपास

googlenewsNext

बीड : शहरातील सारडानगरीत बंद घराचे कुलूप तोडून एक चोरी केली तर दोन ठिकाणी अयशस्वी प्रयत्न झाला. तसेच विद्यानगर भागात एका एलआयसी अधिकाºयाच्या घरी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. या सर्व घटना सोमवारी रात्री घडल्या. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरांनी पोलिसांना एक प्रकारे खुले आव्हानच दिले आहे. या घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे.

सारडानगरीतील तीनही चो-या या कुलूपबंद घरात झाल्या आहेत. जयप्रकाश चरखा हे आपल्या भावाकडे झोपण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी नगरीत मागच्या संरक्षक भिंतीवरून प्रवेश करीत चरखा यांच्या घराचे कुलूप तोडून चांदीचे शिक्के व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.

त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा रवींद्र कुलकर्णी यांच्या बंद घराकडे वळविला. परंतु घरात त्यांना काहीच सापडले नाही. येथे अपयश आल्यानंतर चोरटे अभिषेक देशपांडे यांच्या बंद घराकडे गेले. त्यांच्याही घराचे कुलूप तोडून त्यांनी आतप्रवेश करीत कपाट व इतर सामानाची उचकापाचक केली. परंतु त्यांना हाती काहीच लागले नाही. या चोºया करण्यापूर्वी बाजूच्या घरांच्या कड्या बाहेरून लावण्यात आल्या होत्या. हे शेजारी सकाळी उठल्यावर घर उघडण्यास गेले. परंतु घर बाहेरून बंद असल्याचे समजले. त्यांनी आरडाओरडा केला असता चोरीचे प्रकार निदर्शनास आले. घटनेची माहिती समजताच शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी धाव घेतली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनीही भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शहर ठाण्यात नोंद करण्यात आली.
दुसरी घटना शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील विद्यानगर (प.) भागात घडली. एलआयसी अधिकारी प्रशांत सक्सेना हे आजारी असल्याने त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व कुटूंब पुण्यालाच होते. मंगळवारी पहाटे त्यांच्या पत्नी अमृता सक्सेना या बीडला आल्या. अपार्टमेंटमध्ये वर जात असतानाच त्यांना पायºयावर आपल्या घराचे कुलूप पडलेले दिसले. त्यांनी घराकडे धाव घेतली असता आपल्या घरात चोरी झाल्याचे दिसले. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एक लाख ३० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. शिवाजीनगर ठाण्यात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे.


एसपींची दोन्ही ठाण्यांना भेट
एकाच रात्री चार चोºया झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी बीड शहर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याला भेट देऊन तात्काळ तपास लावण्याचे आदेश दिले.
अंभोरा चोरी प्रकरणाचा तपास सुरू असताना बीडमधील माहिती समजल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी दुपारी सर्व ठिकाणी भेटी दिल्या. त्यांच्यासोबत सपोनि दिलीप तेजनकर, सचीन पुंडगे दरोडा प्रतिबंधकचे सपोनि श्रीकांत उबाळे यांच्यासह कर्मचारी हजर होते.

Web Title: Four beats in a single night in Beed; Lakhs of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.