बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गँगवॉर संपवले : पंकजा मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 03:52 PM2018-12-13T15:52:07+5:302018-12-13T15:53:06+5:30

हारले तर सन्मानाने हार स्वीकारेल आणि जिंकले तर तुमचा सन्मान वाढवेल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Gangwar in Beed district politics is vanished by me : Pankaja Munde | बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गँगवॉर संपवले : पंकजा मुंडे 

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गँगवॉर संपवले : पंकजा मुंडे 

Next

बीड : मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना महाराष्ट्रातील गँगवॉर संपवले होते. तसे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गँगवॉर संपण्यात मला यश मिळाले आहे, अशा शब्दात विरोधी राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हातील राजकारणावर असलेला वचक दाखवून दिला.  

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून आम्ही काम करतो, आता त्यांची मुळं जमिनीत खोलवर गेली आहेत, ही मुळं चांगल्या विचाराची व संस्कृतीची आहेत, दहशतीची किंवा कुणाला त्रास देणारी नाहीत.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आम्हा तीनही मुलींवर चांगले संस्कार केले, खंबीरपणे वाढवले, त्यांनी आम्हाला हिंमत तर दिलीच पण त्याचबरोबर दयाळूपणाही शिकवला. त्यांच्या अशा संस्कारामुळे  समाजातील वंचित पीडित घटकांची सेवा करण्याची ताकद आम्हाला मिळते, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. माझे नुकसान करताना इतरांच्या दहा चुली बंद करण्याचे पाप करू नका, समोरु न वार करा, हारले तर सन्मानाने हार स्वीकारेल आणि जिंकले तर तुमचा सन्मान वाढवेल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

याप्रसंगी मंत्री राम शिंदे, महादेव जानकर आ. आर टी देशमुख,आ. संगीता ठोंबरे, आ. सुरेश धस, आ. सुधाकर भालेराव, आ. मोहन फड, आ. मोनिका राजळे, आ. पवार, गोविंदराव केंद्रे, बाबुराव पोटभरे, फुलचंद कराड, राधाताई सानप, यांनी आपल्या भाषणात मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

दुटप्पीपणा जास्तकाळ चालणार नाही 
मुंडे साहेबांनी आयुष्यात अनेक आघात सहन केले पण आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. अनेक लोकांना त्यांनी घडवले, दु:खावर फुंकर घातली, पण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. सध्या कांही जण मात्र एकीकडे त्यांचा वारसा सांगतात आणि नांव मात्र दुसऱ्याचे घेतात, असा दुटप्पीपणा फार काळ चालणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली. 
 

Web Title: Gangwar in Beed district politics is vanished by me : Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.