बीडमधील सुमित वाघमारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:11 AM2018-12-25T09:11:46+5:302018-12-25T09:17:21+5:30
खूनाचा कट रचनारा कृष्ण क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी सोमवारी गजाआड केले होते.
बीड : बीडमधील सुमित वाघमारे या युवकाचा प्रेमप्रकरणातून मेहूना बालाजी लांडगे आणि त्याचा मित्र संकेत वाघ यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली होती. त्यानंतर आरोपींनी पलायन केले होते.
यात या खूनाचा कट रचनारा कृष्ण क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी सोमवारी गजाआड केले होते. त्यानंतर आज पहाटे मुख्य आरोपी बालाजी व संकेत यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि अमोल धस, दिलीप तेजनकर, पेठबीडचे सपोनि उदावंत आणि विशेष पथके आरोपींच्या शोध घेत आहेत.