भाजप सरकारने केले मराठवाड्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:21 AM2018-10-02T00:21:59+5:302018-10-02T00:22:50+5:30

भाजप सरकारने व मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात ११ हजार कोटी रुपयांची गुंवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचे काय झाले, भाजप सरकारने मराठवाड्याचे नुकसान केले आहे, अशी टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. बीड येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. याप्रसंगी जयंत पाटील हे बोलत होते.

Marathwada damage caused by BJP government | भाजप सरकारने केले मराठवाड्याचे नुकसान

भाजप सरकारने केले मराठवाड्याचे नुकसान

Next
ठळक मुद्देफडणवीसांचा मराठवाड्यावर राग : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भाजप सरकारने व मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात ११ हजार कोटी रुपयांची गुंवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचे काय झाले, भाजप सरकारने मराठवाड्याचे नुकसान केले आहे, अशी टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
बीड येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. याप्रसंगी जयंत पाटील हे बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, हा विजयी संकल्प असून, भारतीय जनता पार्टीच्या विर्सजनाची देखील सभा आहे. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे, याच मराठवाड्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी ११ हजार कोटी गुंतवणूक करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र मराठवाड्यातील युवकांना फसवण्याचे काम या देवेंद्र आणि नरेंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे मराठवाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे मराठवाड्याला विशेष पॅकेज देण्याची मागणी यावेळी जयंत पाटील यांनी केली. १५ व्या वित्त आयोगाने दिलेल्या अहवालात सांगितले आहे की, विकासाच्या दृष्टीने मराठवाडयातील शेतकरी, युवक, नौकरदार हे मागास आहे. तरी देखील शासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना मराठवाड्याकरता राबवली जात नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आल्याचे जयंत पाटील म्हणाले.
इंधन दरवाढीतही हा दुजाभाव का ?
देशात इंधन दरवाढ झाली, त्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले, महागाई वाढली आहे इंधनाचे दर ९० रुपयांच्या पुढे गेले आहेत. यात देखील मराठवाड्यातील नांदेड व परभणीत इतर ठिकाणांपेक्षा इंधन दर अधिक आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्यावर राग असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
बीडमध्ये राष्टÑवादीचे सर्व नेते व्यासपीठावर
सोमवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने पहिल्या विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर जिल्ह्यातील सर्व नेते गटबाजी विसरुन एकत्र दिसले. जिल्ह्यातील लोकसभेची एक जागा व विधानसभेच्या सर्व जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या सभेत केला.
व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपाध्यक्ष आ. जयदत्त क्षीरसागर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, उषा दराडे, आ. सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ. रामराव वडकुते, जीवनराव गोरे, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, बाळासाहेब आजबे, विजयसिंह पंडित, जयसिंह सोळंके, राजेंद्र जगताप, रवंीद्र क्षीरसागर, सय्यद सलीम, भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, बजरंग सोनवणे, सुभाष राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डी झोनमध्ये कायकर्ते
जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थांच्या गर्दीमुळे सभेसाठी बसण्यास जागा नव्हती. त्यामुळे शेकडो श्रोत्यांना उन्हाच्या तडाख्यात उभे रहावे लागले. माजी आ. सय्यद सलीम यांचे भाषण सुरु असताना ही बाब लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पोलिसांना विनंती केली. त्यानंतर उन्हातील कार्यकर्ते, श्रोते डी झोनमध्ये येऊन बसले.

Web Title: Marathwada damage caused by BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.