तनुश्री दत्ता विरोधात मनसेची अब्रूनुकसानीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:34 PM2018-10-03T17:34:04+5:302018-10-03T18:00:01+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतीत अपशब्द वापरल्या प्रकरणी मनसेकडून तक्रार
केज (बीड ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतीत अपशब्द वापरल्या प्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ता विरुद्ध मनसेने आज केज पोलीस स्थानकात अब्रूनुकसानीची तक्रार दाखल केली. या प्रकरणी मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मुंबई येथे घेतलेल्या पत्र परिषदेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरुन, 'मनसे गुंडोवाला पक्ष है' असे संबोधले व सदर व्हिडिओ युट्यूबवर प्रसिद्ध केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अब्रू नुकसान केल्याची तक्रार मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी आज केज पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून पोलिसांनी अभिनेत्री तनुश्री दत्ता विरोधात भादवी कलम ५०० अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
काय शिक्षा व्होऊ शकते ?
हा अदखलपात्र गुन्हा जामीनपात्र असून या गुन्ह्यात आरोपीस २ वर्षांचा साधा कारावास किंवा दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.