बीड येथे कीर्तन महोत्सवात एकाचवेळी झाले 301 कन्यारत्नांचे नामकरण; मातेला आहेर अन् मुलीला चांदीचे कडे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:25 PM2018-01-10T12:25:54+5:302018-01-10T12:26:57+5:30

यंदा दुसर्‍या वर्षीही ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमातंर्गत  आजच्या सकाळच्या सत्रात 10 वा. मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

Naming of 301 girl children at the time of Keertan Festival at Beed; Mother's daughter and girl's gift to silver | बीड येथे कीर्तन महोत्सवात एकाचवेळी झाले 301 कन्यारत्नांचे नामकरण; मातेला आहेर अन् मुलीला चांदीचे कडे भेट

बीड येथे कीर्तन महोत्सवात एकाचवेळी झाले 301 कन्यारत्नांचे नामकरण; मातेला आहेर अन् मुलीला चांदीचे कडे भेट

googlenewsNext

बीड : भव्य सभामंडप...एकाचवेळी तब्बल 301 पाळण्यात बसवलेल्या चिमुकल्या... व्यासपीठावरुन गायिली जाणारी बारशाची गीते...अन् तुडूंब भरलेल्या सभामंडपात नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई...हे चित्र बीडकरांनी अनुभवले ते येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणच्या 14 व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आयोजीत कन्यारत्नांच्या सामुहिक नामकरण सोहळ्यात..! यंदा दुसर्‍या वर्षीही ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमातंर्गत  आजच्या सकाळच्या सत्रात 10 वा. मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुलींच्या जन्माचे असे स्वागत तुम्ही कधीच बघितले नसेल. जन्मलेल्या मुलींचे नामकरण करण्याच्या सोहळा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात होत असतो. बीडमध्ये मात्र हा नामकरण सोहळा अनोख्या पद्धतीने करण्यात आला. एकाच मांडावाखाली तब्बल 301 मुलींचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम सगळ्यांचेच डोळे दिपवणारा ठरला. मुलींच्या जन्माचे असे भव्य-दिव्य स्वागत बीडकरांनी दुसर्‍यांदा अनुभवले ते स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणच्या पुढाकारामुळे..!
रंगीबेरंगी मंडपाची सजावट,तब्बल 301 पाळणे आणि त्यातच संगीतमय वातावरणात गायक अनघा काळे आणि गौरव पवार यांनी सादर केलेली बारशाची गीते, अशा उत्साहात  गोंडस मुलींचा झालेला नामकरण विधी हे मनोहरी दृश्य अनेकांनी याचि देहि याचि डोळा साठवले. मागील 14 वर्षापासून बीड शहरात स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आजोजन केले जाते. यावर्षी प्रतिष्ठानकडून 15 ऑक्टोबर 2017 ते 8 जानेवारी 2018 या कालावधीत जन्मलेल्या 301 मुलींचा नामकरण सोहळा सानंद संपन्न झाला. यावेळी 301 मुलींचे पाळणे हलवण्यात आले. मुलीच्या आत्यांनी मुलींना कानात सूचवल्याप्रमाणे नामकरण झाले. आपल्या मुलीचा इतका सुंदर आणि अनोखा नामकरण सोहळा पार पडत असताना मुलींच्या आईच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. 
या नामकरण सोहळ्यात बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील महिलांनी देखील सहभाग नोंदविला होता,तसेच महिलांचे नातेवाईकही आर्वजून उपस्थित राहिले होते.. खटोड सामाजिक प्रतिष्ठानने यंदाच्या कीर्तन महोत्सवात दुसर्‍यांदा हा वेगळा उपक्रम राबवल्याने मुलींच्या आईने प्रतिष्ठानचे आभार मानले.जो जिल्हा स्त्री भु्रुण हत्येमुळे कलंकीत झाला होता, आज त्याच बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे  स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानकडून झालेले स्वागत निश्‍चितच स्वागतार्ह आहे अशा प्रतिक्रिया याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त करत प्रतिष्ठानचे कौतूक केले.यंदाच्या 14 व्या कीर्तन महोत्सवाचा समारोप अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने करण्यात आला.

मातेला साडीचोळीचा आहेर अन् 
मुलीला पाळण्यासह चांदीचे कडे,भेटवस्तू

मुलींच्या नामकरण सोहळ्यात मुलींना पाळणा,कपडे,खेळणी, चांदीचे  वाळे,अशा वस्तु भेट स्वरुपात देण्यात आल्या तर मुलीच्या मातेला साडीचोळीचा आहेर, तसेच फेटा बांधून हळदी-कुंकू करत स्वागत सत्कार करण्यात आले. ऐरवी चार भिंतीच्या आत होणार्‍या बारशाला घरातील लोक आणि आप्तेष्ट उपस्थित असतात. बीडमध्ये मात्र हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मुलीचा नामकरण सोहळा पार पडल्याने या मातांचा आनंद गगनात मावत नव्हता.

Web Title: Naming of 301 girl children at the time of Keertan Festival at Beed; Mother's daughter and girl's gift to silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.