बीड जिल्ह्यात ४३० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:04 AM2017-12-07T00:04:55+5:302017-12-07T00:05:08+5:30

मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असून, ४३० कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन बुधवारपासून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे.

Rs 430 crore loan waiver in Beed district | बीड जिल्ह्यात ४३० कोटींची कर्जमाफी

बीड जिल्ह्यात ४३० कोटींची कर्जमाफी

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच निधी होणार वर्ग, खाते बेबाकचा मिळणार मेसेज

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असून, ४३० कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन बुधवारपासून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे.
८९ हजार २५३ पैकी ४० हजार १८८ लाभार्थी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे असून उर्वरित लाभार्थी राष्टÑीयकृत बॅँकांचे आहेत.

शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर निकष ठरविले होते. त्याची छाननी करण्यात बॅँकांचा वेळ गेला. नंतर आयटी सेंटरकडून मागविली जाणारी माहिती, सॉफ्टवेअरमधील बदलामुळे विलंब होत असल्याने सरकारवर टिकेची झोड उठली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले होते. यात २००९ ते २००१६ पर्यंतच्या कर्जदार शेतक-यांचा समावेश आहे.
१ डिसेंबर रोजी बीड जिल्हा दौºयावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडवणी येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांचे ८०० कोटी रुपये माफ होतील असे संकेत दिले होते. त्यामुळे आशा पल्लवीत झाल्या होत्या. आतापर्यंत तीन ग्रीन लिस्ट जारी झाल्या होत्या. आॅक्टोबरमध्ये पहिला टप्पा, २४ नोव्हेंबर रोजी दुसरा टप्पा तर तिसरा टप्पा ६ डिसेंबर रोजी याप्रमाणे ग्रीन लिस्ट प्राप्त होऊन तो निधी बॅँकांना मंजूर झाला. संबंधित कर्जदार शेतकºयाच्या खात्यावर तो जमा करुन खाते बेबाक करण्यात आले.

जिल्हा बँकेचे ४० हजार १८८ लाभार्थी
जिल्ह्यातील अकरा बॅँकांतील पात्र ८९ हजार २८३ शेतकरी कर्जदारांना ४३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. शासन निर्देशानुसार पुढील प्रक्रिया बॅँकेमार्फत होईल, असे जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Rs 430 crore loan waiver in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.