गांजाच्या झुरक्यासाठी तीन तरुणांनी लुटले प्रवाशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:29 AM2018-12-20T00:29:25+5:302018-12-20T00:30:02+5:30

गांजाच्या व्यसनापायी तीन तरूणांनी एका प्रवाशास मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या प्रकरणाचा छडा लावत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या.

Three youth looted passenger | गांजाच्या झुरक्यासाठी तीन तरुणांनी लुटले प्रवाशाला

गांजाच्या झुरक्यासाठी तीन तरुणांनी लुटले प्रवाशाला

googlenewsNext
ठळक मुद्देबीडमधील प्रकार : अवघ्या सहा तासामध्येच प्रकरणाचा छडा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गांजाच्या व्यसनापायी तीन तरूणांनी एका प्रवाशास मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या प्रकरणाचा छडा लावत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेख शाहरूख शेख बाबा (२६), शेख आमेर शेख अख्तर (२३) व शेख अब्बास शेख रशीद (२५ सर्व रा.बीड) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. सय्यद सज्जात शामद (२३ रा.नित्रूड ता.माजलगाव) हे पुण्यात चालक म्हणून काम करतात. बुधवारी गावाकडे कार्यक्रमानिमित्त ते आले होते. रात्री ८ वाजता ते बीडमध्ये उतरले.
मात्र, गावाकडे जाण्यास उशीर झाल्याने ते बीडमधील बार्शी नाक्यावरील शेख इम्रान या पाहुण्याकडे राहण्यासाठी रिक्षातून (एमएच २३ एआर ०२३९) निघाले. बसस्थानकापासून थोडे पुढे आल्यावर आणखी दोघे रिक्षात बसले.
सोमेश्वर मंदिराजवळ जाताच त्यांनी रिक्षा स्मशानभूमीकडे वळविला. येथेच त्यांना मारहाण करून मोबाईल व रोख ९० रूपये काढून घेत त्यांनी पोबारा केला. त्यानंतर सय्यद यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली आणि अवघ्या सहा तासांत तिघांच्याही मुसक्या आवळल्या.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, सहायक पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे व त्यांच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एस. ढगारे हे करीत आहेत.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
४यातील शाहरूख हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
४तसेच सदरील टोळीने अनेकांना रात्रीच्यावेळी लुटल्याची शक्यता आहे.
४तपासात त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची कबुली मिळू शकते, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Three youth looted passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.