बदललेल्या परिस्थितीत पुन्हा एकदा लेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:59 PM2018-01-06T16:59:25+5:302018-01-06T17:00:07+5:30

पत्रकारांनी निर्भिडपणाने आपली लेखणी चालवून सर्व सामान्यांना न्याय द्यावा. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्ष असो त्यांच्या चुकांवर बोट दाखवून त्यांनी बातमीदारी केली पाहिजे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दर्पण दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

Time to change from stylus to change in time - Dhananjay Munde | बदललेल्या परिस्थितीत पुन्हा एकदा लेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ - धनंजय मुंडे

बदललेल्या परिस्थितीत पुन्हा एकदा लेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ - धनंजय मुंडे

googlenewsNext

परळी (बीड) : पत्रकारांनी निर्भिडपणाने आपली लेखणी चालवून सर्व सामान्यांना न्याय द्यावा. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्ष असो त्यांच्या चुकांवर बोट दाखवून त्यांनी बातमीदारी केली पाहिजे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दर्पण दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन मध्ये परळी पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी दर्पण दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, देशात पत्रकार, विचारवंत, लेखकांचे जिवन असुरक्षीत झाले आहे. अशावेळी वातावरण अबाधित ठेवण्यासाठी पुन्हा लेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ येवून ठेपली आहे. पत्रकारांनीही निर्भिडपणाने लिखाण करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा. याप्रसंगी रिपाई चे राज्य उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे, पत्रकार रामप्रसाद शर्मा माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, जी.एस.सौंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमात रामप्रसाद शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. संचलन रानबा गायकवाड यांनी केले. तर आभार संजय खाकरे यांनी मानले. या कार्यक्रमास पत्रकार हल्ला विरोधी कृति समितीचे निमंत्रक मोहन व्हावळे, ज्ञानोबा सुरवसे, माजी तालुका अध्यक्ष प्रेमनाथ कदम, धनंजय आढाव, किरण धोंड, शंकर इंगळे , बालााप्रसाद व्यास , ,बाजीराव काळे,  परळी कुस्तीगीर परिषदचे तालुका अध्यक्ष मुरलीधर मुंडे, भगीरथ बद्दर, शेख मुकरम, बालकिशन सोनी, धिरज जंगले, संतोष जुजगर, माणिक कोकाटे, संजिव रॉय, कैलास डुमने, महादेव गित्ते, बाळासाहेब फड , अनंत गित्ते, अमोल सुर्यवंशी, अशोक मुंडे, गणेश आदोडे, प्रा. दशरथ रोडे, अमोल सुर्यवंशी, चंद्रमणी वाघमारे, सुमंत गिरी,एन.के. वडगावकर,जगन्नाथ सुर्यकर, माजी न.प.सभापती ओमप्रकाश सारडा, रा.कॉं.चे जिल्हाउपाध्यक्ष सुरेश टाक, बाशीद भाई,  संतोष शिंदे, दिनेश गजमल व सर्व पत्रकारांची  उपस्थित होती.

Web Title: Time to change from stylus to change in time - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.