'तुम्ही मुख्यमंत्री असाल, पण अमित शहा तडीपार होते हेही लक्षात ठेवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 08:24 AM2019-02-24T08:24:13+5:302019-02-24T08:26:15+5:30

मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये काल छगन भुजबळ साहेबांवर टीका केली, ते म्हणाले ती भुजबळ यांनी आमच्यावर टीका करू नये

'You should be the chief minister, but remember that Amit Shah was brilliant' | 'तुम्ही मुख्यमंत्री असाल, पण अमित शहा तडीपार होते हेही लक्षात ठेवा'

'तुम्ही मुख्यमंत्री असाल, पण अमित शहा तडीपार होते हेही लक्षात ठेवा'

Next

बीड - परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रा समारोप सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना टार्गेट केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा समाचार घेताना, धनंजय मुंडेंनी अमित शहांचा दाखला दिला. भुजबळ हे जामीवर आहेत, हे आम्हाला माहितीय. पण, अमित शहा हे तडीपार आहेत, हेही लक्षात असू द्या, असे म्हणत धनंजय यांनी परळीतील सभेत फडणवीसांना लक्ष्य केलं.  

योगायोग बघा कसा आहे, या परिवर्तन यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होऊन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आशिर्वाद घेऊन झाली होती. सांगता शिवशंभू वैजनाथाच्या चरणी होत आहे, असे म्हणत धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यामध्ये, विरोधकांवर कडक शब्दात टीकाही केली. मुख्यमंत्री काल सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त येथे आले होते. मला वाटलं ते नवीन जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी आले होते, पण परिवर्तन यात्रेच्या सभेने त्यांच्या काळजात कळ आणली आहे. त्यांनी परिवर्तनावर टीका केली, पण तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप या परळीतून होईल, असे म्हणत धनंजय यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं.  

मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये काल छगन भुजबळ साहेबांवर टीका केली, ते म्हणाले ती भुजबळ यांनी आमच्यावर टीका करू नये. तुम्ही जामीनावर सुटले आहात. मी मुख्यमंत्र्यांना सांगू ईच्छीतो की तुम्ही मुख्यमंत्री असाल मात्र, आमच्या वाटेला जाऊ नका. जशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे. अमित शाह तडीपार आहे, तुम्ही कोणावर आरोप करता? आधी 16 मंत्र्यांचे जे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले आहे, त्याची चौकशी करा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या अमित शहांच्या तडीपारीची आठवण करुन दिली. त्यानंतर, पंकजा मुंडे यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. 


माझ्या बहिणबाई म्हणाल्या की, राष्ट्रवादीचा समारोप करू, पण राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणे चिक्की खाण्याइतके सोपे नाही. लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत समोरासमोर या बघू कोण संपतंय, असे ते म्हणाले. तसेच जे लोक आज स्वतःला स्व गोपीनाथ मुंडे साहेबांचे राजकीय वारस सांगत आहे त्यांच्या सरकार घोषणा केली की स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या नावे उसतोड कामगार महामंडळ बनवले जाईल. मी दूरबीन लावून सोधलं पण ऊसतोड कामगारांचं महामंडळ काही सापडले नाही, ते महामंडळच रद्द केले. हा स्व गोपीनाथ मुंडे यांचा अपमान आहे, असे म्हणत ऊस तोड कामगार महामंडळ हे गाजर असल्याचा आरोपही धनंजय मुंडेंनी केला. 

Web Title: 'You should be the chief minister, but remember that Amit Shah was brilliant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.