वर्षभरात जुळल्या २५ रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:39 PM2017-12-29T22:39:52+5:302017-12-29T22:40:21+5:30

मानवी मन केव्हा कुणात गुंतेल याचा नेम नाही. प्रेमाचाही असाच प्रकार आहे.

25 silk threads matched over the year | वर्षभरात जुळल्या २५ रेशीमगाठी

वर्षभरात जुळल्या २५ रेशीमगाठी

Next
ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव : विशेष विवाह काळाची गरज

इंद्रपाल कटकवार ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : मानवी मन केव्हा कुणात गुंतेल याचा नेम नाही. प्रेमाचाही असाच प्रकार आहे. त्याग आणि विश्वास एकत्र आले की प्रेमाची उत्पत्ती झाल्याशिवाय राहात नाही. अशा प्रेमाचे रूपांतर नंतर लग्नात होते. मन जुळली की रेशीमगाठी जुळायला वेळ लागत नसला तरी समाजाच्या भितीने लग्नात आडकाठी येतील. अशा स्थितीत विशेष विवाह कायद्याचा आधार घेतला जातो. वर्षभरात जिल्ह्यात २५ तरूण-तरूणींनी विशेष विवाह कायद्याचा वापर करून रेशिमगाठ बांधली आहे.
विशेष विवाह कायदा १९५४ या कायद्यांतर्गत विवाह करताना वधू-वर यांना कुठल्याही जाती किंवा धर्माचे बंधन नाही. विशेष विवाह करणारा अविवाहित असावा किंवा विवाहित असल्यास पुर्वीच्या लग्नातील जोडीदारापासून घटस्फोटीत किंवा तो जोडीदार हयात नसावा. विशेष विवाहाची नोटीस देताना वधू-वरापैकी किमान एक पक्षकार नोंदणी विवाह करणाºया अधिकाºयांच्या कार्यक्षेत्रात ३० दिवसांपासून वास्तव्यास असला पाहिजे, असा नियम आहे. राज्यातील सर्वच जिल्हा मुख्यालयात या कायद्यांतर्गत नियुक्त केलेले विवाह अधिकारी विशेष विवाह संपन्न करतात.
भंडारा जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत २५ जोडप्यांनी शुभमंगल उरकविले आहे. पैसा व वेळेची बचत याशिवाय जाती-धर्माच्या बंधनाला झुगारून कायद्याच्या आधारे या तरूणांनी समाजापुढेही आदर्श निर्माण केला आहे. यात एका विवाहासाठी जवळपास २५० रूपयांचा खर्च येतो. नोटीस दिल्याच्या एक महिन्यानंतर व ९० दिवसांच्या आत विशेष विवाहाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

स्पर्धेच्या युगात वेळ आणि पैशांची बचत करण्याच्या दृष्टीकोनातून विशेष विवाह करणे काळाची गरज आहे. यातून पैशाची उधळपट्टी होण्यापासून मज्जाव होतो तसेच या पैशाचा वापर युगलाच्या कल्याणासाठी करता येतो.
-जे.एम. चतुर, सहायक दुय्यम निबंधक तथा विशेष विवाह अधिकारी भंडारा.

Web Title: 25 silk threads matched over the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.