गैरकायदेशीर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:19 AM2017-07-25T00:19:45+5:302017-07-25T00:19:45+5:30
विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची सुरक्षितता ही संबंधित स्कुलच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची जवाबदारी असुन ....
विनिता साहू : घ्यावयाच्या काळजीचे मार्गदर्शन, उपचारपेटी, अग्निशमन यंत्र ठेवण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची सुरक्षितता ही संबंधित स्कुलच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची जवाबदारी असुन स्कुलबसमध्ये प्रथम उपचार पेटी, अग्नीशमन साधने असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिा साहू यांनी केले.
जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची सभा पोलीस अधिक्षक विनीता एस यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस मुख्यालयात पार पडली. यावेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या. सदर सभेत समिती सचिव तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, पोलीस निरीक्षक वाहतुक नियत्रंण भंडारा गाडे, जिल्हा परीषद नगर परीषद शिक्षण विभाग व राज्य परिवहन मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विनीता साहू यांनी, स्कुल बस सुरक्षिततेकरिता उप प्रादेशिक परिवहन पोलीस विभाग व अन्य विभागाकडून केलेल्या कार्यवाही व उपाययोजनांचा आढावा घेतला. स्कुल बस तसेच अन्य मोटार वाहनांतून करण्यात येणारी शालेय विद्यार्थ्याची वाहतुक व सुरक्षितता हा अतिशय संवेदनशिय असुन याअनुशंघाने पारीत करण्यात आलेले कायदे, शासनाकडुन प्राप्त परिपत्रके बनविण्यात आलेले नियम व सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेली मार्गदर्शन तत्वे यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले. स्कुल बसचा वेग तासी ४० कि.मी पेक्षा अधिक असणार नाही तसेच निश्चीत केलेल्या विद्यार्थ्याच्या संख्येपेक्षा अधिक विद्यार्थ्याची वाहतुक केली जाणार नाही प्रत्येक स्कुल बस मध्ये महिला किंवा पुरुष अटेडेंन्ट असावा.
प्रत्येक स्कुलने विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेकरीता ट्रॉफीक वार्डन नेमावे शाळेने स्कुल बसमधील विद्यार्थ्यांचा जीवन विमा काढणे आवश्यक आहे. तसेच स्कुल बस चालकांची नियीमत वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
चालकाकडे बस मध्ये सर्व विद्यार्थाची नाव, पत्ते, ब्लड ग्रुप इ. ची. यादी असणे बंधनकारक आहे. अशी मार्गदर्शक तत्वे असुन विना नोंदणी स्कुल बसेस, विना परवाना गैर कायदेशिर पणे गॅस सिट बसवुन विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या व्हॅन, गैरकायदेशिरपणे विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या अॅटोरिक्षाविरुध्द माहिम राबवुन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणाऱ्या सुचना उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागास दिल्या.
तसेच विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेकरिता सर्व शाळांना त्याचे परिसरात, त्याच प्रमाणे स्कुलबसमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना दिल्या.