समाज माध्यमांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:30 PM2017-11-16T23:30:36+5:302017-11-16T23:31:10+5:30

स्वातंत्र मिळविण्यासाठी मोलाचे योगदान देणाºया पत्रकारितेच्या क्षेत्रातही कालानुरुप आमूलाग्र बदल झाला आहे.

Challenge of credibility in front of the community media | समाज माध्यमांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

समाज माध्यमांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

Next
ठळक मुद्देपत्रकारदिनाच्या चर्चेतील सूर : माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वातंत्र मिळविण्यासाठी मोलाचे योगदान देणाºया पत्रकारितेच्या क्षेत्रातही कालानुरुप आमूलाग्र बदल झाला आहे. या बदलामध्ये सर्वात मोठा बदल हा समाज माध्यमांनी घडवून आणला असून मोबाईल व इंटरनेट क्रांतीमुळे प्रत्येक व्यक्तींच्या हातात स्वतंत्र माध्यम आले आहे. समाज माध्यमासमोर विश्वासार्हतेचे मोठे आव्हान असून या माध्यमाचा उपयोग सामान्य माणसाच्या हितासाठी झाल्यास समाज माध्यम अधिक प्रभावी ठरेल, असा सूर माध्यमासमोरील आव्हाने या विषयावरील चर्चेत उमटला.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयात ‘माध्यमासमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सदानंद मोहतुरे, पत्रकार दिपक फुलबांधे, नरेश बोपचे, काशिनाथ ढोमणे, विजय निचकवडे, दिपेंद्र गोस्वामी, तथागत मेश्राम, राजू मस्के, श्रीकांत पनकंटीवार, अजय मेश्राम, दीपक रोहणकर, प्रल्हाद हुमणे, ललितकुमार बाच्छिल, जिल्हा माहिती कार्यालयातील सुनिल जांभूळे, घनश्याम खडसे, बंडूसिंग राठोड, विजय डेहनकर, सुनिल फुलसुंगे, घनश्याम सपाटे, रेखा निनावे उपस्थित होते.
‘माध्यमासमोरील आव्हाने’ या विषयावर उपस्थित पत्रकारांनी चर्चा केली. माध्यमासमोर सद्या समाज माध्यमाचे मोठे आव्हान उभे आहे. समाज माध्यमात प्रसारित होणाºया बातम्या व व्हिडीओबाबत सत्यता पडताळणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. त्याच प्रमाणे सामाजिक समस्या व ग्रामीण भागातील प्रश्न यांना माध्यमात मोठया प्रमाणात जागा देणे आवश्यक असल्याचे मत या चर्चेत मांडण्यात आले. वेब मिडीया हे नवे व्यासपिठ समाजमाध्यमात निर्माण झाले आहे.
अनेक सोशल साईटवर चॅनल आपले स्वत:चे चॅनल बनविण्याचे सुविधा प्राप्त झाल्यामुळे वेब मीडियाची व्याप्ती वाढली आहे. विशेष म्हणजे समाज माध्यमातून प्राप्त झालेल्या संदेशाची खातरजमा न करता तशाच इतरांना फॉरवर्ड करण्याची वृत्ती सुद्धा माध्यमासमोर मोठे आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. अशा विविध माध्यमाचा विचार केला असता माध्यमासमोरील सर्वात मोठे आव्हान विश्वासार्हतेचे आहे. समाज माध्यमात प्रसारित होणाºया वृत्तांवर कितपत विश्वास ठेवावा असा सूर या चर्चेत उमटला.
मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकारिता अधिक जबाबदारीची झाली आहे. समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे सामान्य माणसाला आपले विचार व्यक्त करण्याचे व्यासपीठ मिळाले असले तरी या माध्यमाचा वापर बºयाच वेळा सकारात्मक होतांना दिसत नसल्याची खंतही या चर्चेत मांडण्यात आली. एकेकाळी स्वातंत्र मिळविण्यासाठी योगदान देणाºया पत्रकारीता क्षेत्रात कालानुरुप आमुलाग्र बदल झाला आहे. या बदलामध्ये सर्वात मोठा बदल हा समाज माध्यमांनी घडवून आणला आहे. मोबाईल क्रांतीमुळे प्रत्येक व्यक्तींच्या हातात स्वतंत्र माध्यम आले आहे. या माध्यमाचा उपयोग सामान्य माणसाच्या हितासाठी झाल्यास समाज माध्यम अधिक प्रभावी ठरेल, असा सूरही या चर्चेत उमटला.
 

Web Title: Challenge of credibility in front of the community media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.