मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आता एका क्लिकवर
By admin | Published: May 9, 2016 12:33 AM2016-05-09T00:33:43+5:302016-05-09T00:33:43+5:30
महाराष्ट्रातील न विखुरलेल्या गावे/वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी व ग्रामीण रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली आहे.
Next
समिती गठित : दोन महिन्यांत स्वतंत्र संकेतस्थळ
भंडारा : महाराष्ट्रातील न विखुरलेल्या गावे/वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी व ग्रामीण रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
योजनेची अंमलबजावणी सन २०१५-१६ पासून सुरू झालेली आहे. योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांचे प्रभावी सनियंत्रण करणे व सर्वसामान्य जनतेस योजनेअंतर्गत कामांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ७ सदस्यीय समितीचे गठन, कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)