प्राचीन बौद्धस्तुपांचा विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 09:57 PM2018-05-06T21:57:52+5:302018-05-06T21:57:52+5:30
प्राचीन व ऐतिहासिक शहराच्या आजूबाजूला करण्यात आलेल्या उत्खननात प्राचीन बौद्धकालीन वस्तू व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे बौद्धस्तूप आढळून आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : प्राचीन व ऐतिहासिक शहराच्या आजूबाजूला करण्यात आलेल्या उत्खननात प्राचीन बौद्धकालीन वस्तू व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे बौद्धस्तूप आढळून आहेत. पवनी शहर हे पूर्वी बौद्ध धर्माचे मोठे केंद्र असल्याचे मानले जाते. या बौद्धस्तुपाचा बुद्धगया, सारनाथ आदीच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या विकास केल्यास पवनी शहराचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव येवून पर्यटनाची नवी दालने उघडली जातील, यात शंका नाही.
पर्यटनाशी संबंधित नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शहर व तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे येणाऱ्या पर्यटनाच्या संख्येत मागील दोन वर्षात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटक वाढण्याकरिता व पर्यटनस्थळांचा विकास करण्याकरिता शासनस्तरावर नियोजन झाल्यास पर्यटनदृष्ट्या पवनी शहराचा विकास व्हायला वेळ लागणार नाही.
शहरात होत असलेल्या खोदकामात अजूनही प्राचीन वस्तू सापडत आहेत. उत्खननात बुद्धकालीन वस्तू स्तूप सापडले आहेत. शहराजवळ जगन्नाथ टेकडी, चांडकापूर टेकडी, हरदोलाल टेकडी येथे पुराततत्व विभाग व नागपूर विद्यापीठाने ४४ वर्षापूर्वी केलेल्या उत्खननात तीन बौद्धस्तुप मिळाले आहेत. तसेच मोठ्या संख्येने बौद्ध कालीन वस्तू मिळाल्या आहेत. त्यामुळे येथे प्राचीन काळी बौद्ध धर्माचे फार मोठे केंद्र असल्याचे मानले गेले आहे.
पवनी येथील उत्खननात सापडलेल्या अनेक मूर्ती वस्तू आजही मुंबई, दिल्ली, गया आदी शहरातील प्राचीन वस्तू संग्रहालयात आहेत. या वस्तू पवनीच्या प्राचीनतेची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देत आहेत. शहराजवळ मिळालेल्या प्राचीन बौद्ध स्तुपाचा पुरातत्व व पर्यटन विभागाने विकास केल्यास पर्यटनदृष्ट्या व बौद्ध धर्माच्या दृष्ट्या पवनी शहर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
यासोबतच येथे प्राचीन महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यासोबतच येथे प्राचीन ऐतिहासीक वस्तूंचे वस्तू संग्रहालय होण्याची आवश्यकता आहैे. हे वस्तू संग्रहालय पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
येथे पर्यटन वाढण्याकरिता भरपूर वाव आहे. येणाºया दिवसात पर्यटन झपाट्याने वाढणार असल्याने त्या दृष्टीने आता पासूनच नियोजन करण्याची गरज आहे. पर्यटनदृष्ट्या शहराचा विकास झाला तर पवनी तालुक्याला 'अच्छे दिन' यायला वेळ लागणार नाही.