वर्षभरात सिमेंटीकरण रस्त्याचे हाल

By admin | Published: September 15, 2015 12:40 AM2015-09-15T00:40:05+5:302015-09-15T00:40:05+5:30

दोन वर्षापूर्वी बारव्हा बाजारपेठेत शासकीय निधीतून २० लाख रुपये खर्चून काम करण्यात आले.

During the year, the situation of the settlement road | वर्षभरात सिमेंटीकरण रस्त्याचे हाल

वर्षभरात सिमेंटीकरण रस्त्याचे हाल

Next

बारव्हा येथील प्रकार : लक्षावधींचा निधी व्यर्थ
बारव्हा : दोन वर्षापूर्वी बारव्हा बाजारपेठेत शासकीय निधीतून २० लाख रुपये खर्चून काम करण्यात आले. अपुऱ्या जागेत पुन्हा २५ लाखाचा सिमेंटीकरणासाठी निधी देवून शासनाने ग्राहक व्यापा-यांची कोंडी करीत कंत्राटदार पदाधिकाऱ्यांना दिवाळीची भेट देत आहेत. सदर काम कंत्राटदाराने जोमात सुरु करुन वर्षाभरापुर्वीच बनविलेले २ लाख किंमतीचे रस्ते खोदून त्यावर ओटे बनविले.
त्यामुळे स्थानिक दुकानदारांमध्ये असंतोष पसरला आहे. दोन वर्षापुर्वी बाजार सुशोभिकरणासाठी शासनाने २० लाखांचा निधी दिला होता. त्यात १५ लाखांची बाजाराच्या मधोमध दुमजली इमारत बांधण्यात आली. मात्र त्या इमारतीचा काहीही उपयोग होत नाही.
बाजारातील बहुतांश जागा अतिक्रमण धारकांनी बळकावली. त्यामुळे बाजारात जागेचा पूर्वीच अभाव आहे. जुनेच बांधकाम असतांना त्याला पुन्हा सुशोभीत करण्यासाठी फक्त ५ ते ७ लाखांचाच निधी अपेक्षित होता.
२५ लाख खर्च करायचेच होते तर शौचालय, गावापूढं रस्त्यावर गेट, डांबरी रस्त्याच्या दुतर्फा सिमेंटीकरण किंवा मुरमीकरण अशा अनेक योजना बनवून त्यावर अनेक कंत्राटादानी काम केले असते.
निधी एक कामे अनेक होवून याच कंत्राटदाराना काम सुध्दा मिळाले असते. असा सुर गावकऱ्यात धुमसत आहे. होत असलेल्या नविन कामावर अभियंत्याची मेहर असल्रूाने गुणवत्तेत खोट असल्याची ओरड ग्रामस्थांत आहे.
सदर कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. यावर काय कारवाई होते याकडे नागरिवकांच्या नजरा लागलेल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: During the year, the situation of the settlement road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.