साकोलीत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:52 PM2018-01-30T22:52:15+5:302018-01-30T22:52:32+5:30
दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकावर येणाºया किडीमुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागते. अशावेळी शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातून उदरनिर्वाह करीत असतो.
आॅनलाईन लोकमत
साकोली : दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकावर येणाºया किडीमुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागते. अशावेळी शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातून उदरनिर्वाह करीत असतो. अशा स्थितीत दुधाचे भाव कमी करून दुग्ध व्यवसायिकांना अडचणीत आणले जात आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अन्यायाविरूद्ध दुधाचे दर वाढविण्यात यावे, या मागणीसाठी दुध उत्पादक शेतकºयांनी साकोली तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी डॉ.अजय तुमसरे, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, निलु नंदनवार, पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे, सुरेशसिंह बघेल, शैलेश गजभिये, मनोहर नगरकर, विलास शेंडे, सुखदेव मेंढे, अंताराम खोटेले, बहेकार, एकनाथ हुमे, शालिक खर्डेकर, हरिभाऊ बनकर, प्रकाश भुते, वामन चुटे उपस्थित होते.
यावेळी ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती जितकी शेती व्यवसायावर अवलंबून आहे. तितकीच दुधाच्या जोडधंद्यावर आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादीचे प्रदेश सचिव अविनाश ब्राम्हणकर यांनी केले. या आंदोलनानंतर पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेवराव जानकर यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनानुसार गाईच्या दुधाचा शासनाने निर्धारित केलेला दर हा २७ रूपये असून म्हशीच्या दुधाचा निर्धारित दर हा ३६ रूपये आहे. शासन दुधाची उचल करीत नाही व शासनाच्या निर्धारित दराकडे दुर्लक्ष करतो. दुधसंघ प्रती लिटर १८ ते २० रूपये दुधाला भाव देत आहे. अशा स्थितीत शेतकºयाला गाई म्हशीची पालनपोषण करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने दुधाचे दर वाढवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकºयांनी यावेळी दिला.