शेतकºयांवर आता वीजतोडणीची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:24 PM2017-11-12T23:24:01+5:302017-11-12T23:24:16+5:30
वीज बील न भरण्याºया शेतकºयांना त्यांचे थकीत वीज बील भरण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत दिली आहे. ज्या शेतकºयांनी बील भरले नाही, त्यांची वीज कपात महावितरण करणार आहे.
मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर / चौ.: वीज बील न भरण्याºया शेतकºयांना त्यांचे थकीत वीज बील भरण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत दिली आहे. ज्या शेतकºयांनी बील भरले नाही, त्यांची वीज कपात महावितरण करणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे १३०० वीज ग्राहकांवर वीज तोडणीची टांगती तलवार आहे.
महावितरण कार्यालय पालांदूर अंतर्गत सुमारे १३०० ग्राहक असून वीजेच्या वापराएवढे बील ग्राहक भरत नसल्याची ओरड आहे. थकीतचे प्रमाण खूप मोठे असल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे.
गावागावात सुचना फलकाद्वारे, तोंडी ध्वनीक्षेपकाद्वारे, सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतकºयांना वीज बील भरण्याचे आव्हान करण्यात येत आहे. किमान एप्रिल, मे, जून या चालू तीन महिन्याचे वीज बील भरणे आवश्यक केले आहे. या तीन महिन्याचे बील न भरल्यास कृषी संजीवनी योजनेचा लाभ शेतकºयांना मिळणार नसल्याचे सुध्दा सांगण्यात येत आहे.
शेतकºयांची आर्थिकस्थिती भयावह आहे. तत्काळ वीज बील भरणे शक्य नाही. धान हमी केंद्रावर विकणे सुरू आहे. शासनाकडून धान खरेदीची रक्कम जर तत्काळ मिळाली तर नक्कीच शेतकरी फुल ना फुलाची पाकळी वीज बिलापोटी नक्की देईल. शासनाच्या तुघलकी धोरणाने शेतकरी नागवला जात असल्याने शेतकºयांची मानसिकता खचत चालली आहे. शेतकºयाला शासन, प्रशासन दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
महावितरण शेतकºयांप्रती सहानुभूतीपर्वक व्यवहार करीत आहे. शेतकºयांनीसुध्दा महावितरणला सहर्ष सहकार्य करावे. किमान एप्रिल, मे, जून २०१७ ची चालू बील भरून सहकार्य करावे. कित्येक ग्राहकांनी पाच ते सहा वर्षापासून बील भरलीच नसल्याने समस्या आवासून उभी आहे. वीज उत्पादन, वहन, नियोजन याकरिता खर्च अपेक्षितच ठरलाच असल्याने ते करणे भाग आहे.
-पंकज आखाडे, सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय, पालांदूर/चौ.