लक्ष्मीपूजनाच्या रात्री आगीचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:27 AM2017-10-21T00:27:34+5:302017-10-21T00:27:45+5:30
ऐन लक्ष्मीपुजनाच्या रात्री १२.३० च्या सुमारास साकोली तालुक्यातील किन्ही येथे घरासह हॉटेलला भिषण आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एकोडी (साकोली) : ऐन लक्ष्मीपुजनाच्या रात्री १२.३० च्या सुमारास साकोली तालुक्यातील किन्ही येथे घरासह हॉटेलला भिषण आग लागली. यात शासराव वामनराव ढोमणे यांच्या मालकीचे नऊ लक्ष रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.
एकोडी येथून दोन कि़मी. अंतरावर किन्ही हे गाव आहे. किन्ही येथील रहिवासी असलेले शासराव ढोमणे यांचे हॉटेल आहे. शेतजमीन अत्यल्प असल्याने त्यांच्या परिवाराचे उदरनिर्वाह हॉटेल व्यवसायावरच अवलंबून आहे. दिवाळीचे पर्व असल्याचे हॉटेल व्यवसायासाठी लागणाºया साहित्याचा साठा घरी ठेवला होता.
पुजा आटोपून झोपले असला रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याचे ंशेजाºयाकडून कळले. आरडाओरड सुरू झाली. पाहता पाहता याची वार्ता वाºयासारखी गावात पसरली. तेव्हापर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. गावकºयांच्या अथक परिश्रमानंतर पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणली.
या आगीत घरातील हॉटेलचे संपूर्ण सामान व जीवनावश्यक वस्तु जळून खाक झाले होते. मात्र यामध्ये आगीचे कुठलेही कारण कळू शकले नाही.
यामध्ये फ्रिज, नगरी तीस हजार रूपये, सुपारी १०० किलो, साखर ३०० किलो, तांदूळ तिन पोते, कलर टिव्ही, दोन टेबल पंखे व इतर चिल्लर सामान असा एकंदरीत ३ ते ४ लाखांचा सामान जळून खाक झाला. संपूर्ण घराचे नुकसान असा संपूर्ण ९ लाखांचे नुकसान या आगीत झाले. सकाळी येथील तलाठ्याने घटनेचा पंचनामा केला.
ऐन लक्ष्मीपुजनाच्या रात्री लागलेल्या या दुर्देवी आगीत शामराव ढोमणे यांचे घर पुर्णत: खाक झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. या दुर्देवी घटनेची दखल घेऊन शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ढोमणे कुटुंबियासह गावकºयांनी केली आहे.