पाणी प्रश्नाने गाजली ठाण्याची ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:45 PM2017-08-17T23:45:13+5:302017-08-17T23:45:52+5:30
१५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : १५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला. आधी पाणी प्रश्नावर चर्चा करा नंतर समिती गठित करा, असा एकच सुर उपस्थितांकडून निघाला. चर्चा झाली. मात्र समिती गठित झाली नाही. सभाध्यक्ष सरपंच कल्पना निमकर यांनी सभा समाप्तीची घोषणा केली.
नियमानुसार दरवर्षी १५ आॅगस्टला वैयक्ती लाभाच्या योजना व गावातील नवीन योजनाचे योजन आराखडा तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येतो. त्यानुसार १५ आॅगस्टला १२ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे कोरम पूर्ण झाल्याने सभेला सुरूवात करण्यात आली. उपस्थिताकडून हरकतीचा मुद्दा उपस्थित केला की पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण पैसा खर्च झाला. आणि गावाला तीन वर्षापासून एकही थेंब पाणी मिळाला नाही. यावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी हा ज्वलंत प्रश्न असल्यामुळे यावर अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करावी. त्यापुर्वी लोकाभिमूक शासकीय परिपत्रकाचे वाचन व वार्षिक नियोजन विषयक चर्चा होऊ द्या. यावर उपस्थित नागरिकांनी सहमती दर्शवित विषय सुचीनुसार सभेला सुरूवात झाली. ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे यांनी शासन परिपत्रकाचे वाचन केले. स्वच्छते विषयी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. घरकुल यादीचे वाचन करण्यात आले. महात्मा गांधी रोजगार हमीचे पुढील सन २०१८-१९ वार्षिक व सन २०१७-१८ चे पुरक नियोजन विषयक चर्चा घेण्यात आली. यावर उपस्थित पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम यांनी गावातील नोंदणीकृत मजुरांना काम न मिळाल्यामुळे बेकारी भत्ता का देण्यात आलेला नाही. यावर ग्रामरोजगार सेवक हुमणे यांनी याविषयीमाहिती दिली. काम उपलब्ध असताना कामावर घेण्याचे दवंडीद्वारे आवाहन केले असता फक्त दोन मजुर कामावर आले आणि तेही आम्ही खोदकाम करून शकत नाही, असे सांगितले. मग भत्ता देण्याचा प्रश्न येथे येत नाही. व तदनंतर एकच गदारोड उडाला. पुन्हा पाणीप्रश्न आधी घ्या असा एकच सुरू उमटला. यात मागील कार्यकाळात समिती सदस्य असलेले व जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी याविषयी माहिती दिली. पंधरा दिवसात नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. पाणी द्या मगच दारूबंदी करा, स्वच्छ गाव केल्यावर तंमुस समिती गठित करा, अशी मागणी झाली. सभेत व्यत्यय येत असल्याच्या कारण पुढे करीत निमकर यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना विशेष सभेत करण्याचे जाहीर केले.