‘आशा’मुळे समाजाला जीवन जगण्याची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:46 PM2017-12-05T23:46:16+5:302017-12-05T23:46:44+5:30
आशा या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कणा आहे. आशा स्वयंसेविका या विविध सेवा समाजापर्यंत पोहोचवित असतात.
आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : आशा या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कणा आहे. आशा स्वयंसेविका या विविध सेवा समाजापर्यंत पोहोचवित असतात. राज्यात माता मृत्यू व अर्भक मृत्यूदर कमी करण्यात यश प्राप्त झाले. आरोग्य सेवा ही ईश्वरसेवा. या भावनेतून काम करीत असतात. परिणामी आशामुळे समाजमनात जीवन जगण्याची आशा निर्माण झाली, असे प्रतिपादन पंचायत समिती गट विकास अधिकारी सत्येंद्र तामगाडगे यांनी केले.
तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियान आशा स्वयंसेविका योजना अंतर्गत भंडारा तालुका द्वारे आशा दिवस निमित्त उद्घाटकीय भाषणात सत्येंद्र तामगाडगे बोलत होते. यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधुरी माधुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, सांखीकी अधिकारी देविदास चाफले, डॉ. कविश्वर, डॉ. रामटेके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राजेश बुरे, जिल्हा समुह संघटक चंद्रकुमार बारई, उपस्थित होते.
चंद्रकुमार बारई म्हणाले आशा स्वयंसेविका आरोग्य सेवेमध्ये महत्वाची भूमिका पाडीत आहेत. त्यांचा प्रयत्नामुळे आरोग्यसेवा समाजापर्यंत पोहचविणे सहज शक्य झालेले आहे. याप्रसंगी आशा स्वयंसेविका करीता भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होेते. ज्या आशा स्वयंसेविका त्यांच्या कार्यक्षेत्रात नवजात अर्भक मृत्यु व माता मृत्यु झालेले नाही अशा आशांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी स्वयंसेविकाकरिता विपस्यना, आनापना सत्र घेण्यात आले.
यात प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर, पहेला, मोहदुरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके, डॉ. कविश्वर उपस्थित होते. संचालन तालुका समुह संघटक किशोर अमृतकर यांनी केले. आभार देविदास चाफले यांनी मानले. यशस्वितेसाठी कृष्ठरोग तज्ञ ठमके, आरोगय सहायक नान्हे, ढबाले, तालुक्यातील सर्व आशा गट प्रवर्तक यांनी सहकार्य केले.