ग्रामीण मूर्तिकारांवर उपासमारीचे संकट

By admin | Published: September 8, 2015 12:33 AM2015-09-08T00:33:33+5:302015-09-08T00:33:33+5:30

हिंदू धर्मात श्री गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव व लक्ष्मीपूजन या सणासुदीचे दिवस आले की मूर्तिकारांना सुगीचे दिवस येतात.

The hunger crisis of rural sculptors | ग्रामीण मूर्तिकारांवर उपासमारीचे संकट

ग्रामीण मूर्तिकारांवर उपासमारीचे संकट

Next

‘पीओपी’ मूर्तीची विक्री : कारवाईची मागणी
प्रकाश हातेल  चिचाळ
हिंदू धर्मात श्री गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव व लक्ष्मीपूजन या सणासुदीचे दिवस आले की मूर्तिकारांना सुगीचे दिवस येतात. मात्र या विज्ञान युगात पीओपीच्या वापराने कमी वेळात स्वस्त व सुंदर मूर्र्तींची निर्मिती होत असल्याने जिल्हयातील मूर्तिकारांवर उपासमारीचे वेळ आली आहे.
भंडारा जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून प्रख्यात आहे. येथे विविध प्रकारची माती उपलब्ध आहे. मूर्तिकारांना पर जिल्हयात जावे लागत नाही. शहर भागात मातीच्या मूर्तीला मागणी आहे. मात्र काही मूर्तीकार पैशाच्या हव्यासापोटी कमी वेळात जास्त काम पैसे, या दृष्टिकोनातून प्लास्टिकच्या साच्याद्वारे ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्ती तयार करीत आहेत.
सदर मूर्ती पाहावयास सुंदर व वजनाने हलक्या असल्याने ग्राहक त्यांना पसंती देतात. मात्र प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने विसर्जनात नदी, नाले, सरोवरे ठिकाणी पाण्यावर तरंगतात प्लास्टर आॅफ पॅरिसमध्ये रासायनिक केमिकल्स असल्याने पाण्यात प्रदूषण होऊन नदी, नाले सरोवरातील जलचर व अन्य पाळीव प्राणी पाणी पितात. त्यात विविध आजारांचा सामना करावा लागतो. काही वेळा प्राण्यांचा मृत्यूसुद्धा होतो.
मनोभावे पूजा करुन कार्यक्रम घेतात. मात्र विसर्जन करतांना ती पीओपीची मूर्ती पाण्यावर तरंगते, ही बाब त्या मूर्तीची व श्रध्देची विटंबना नव्हे का, असा प्रश्न अनेक भाविकांच्या मनात घोघांवत असतो.
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्र्तींना शासनाच्या निकषानुसार विक्री करतांना लाल रंगाची मार्किंग केली असावी.
सदर मूर्ती विसर्जन करण्यासाठी नियोजीत ठिकाणीच करण्याचे निकष आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसचे मूर्ती तयार करणारे मूर्तिकार, साळू माती, काळी मातीची मूर्ती असल्याचे सांगून शासनाची व ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत.
पवनी तालुक्यात खेड्यापाड्यात कुंभार व मूर्ती कलावंत २० ते २५ च्या घरात आहेत. १२ महिन्यातून दोन महिने मूर्ती तयार करुन उदरनिर्वाह करणे हा त्याचा पिढ्यान्पिढ्या चाललेला व्यवसाय आहे. मात्र काही नामवंत मूर्तिकारांनी प्लास्टर अॉफ पॅरिसच्या लहान मूर्तीपासून सहा ते सात फूट उंच मूर्ती जिल्ह्यातून आणल्याने येथील माती मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
ज्या प्लास्टर आॅफ पॅरिसपासून पर्यावरणाला धोका उद्भवतो असा मूर्र्तीवर बंदी आणून ग्रामीण मूर्तिकारांना न्याय दयावा, अशी मागणी जिल्ह्यातील मूर्तिकारांनी केली आहे.

जलप्रदूषण
सद्यस्थितीत विसर्जनासाठी वापरण्यात येत असलेल्या मूर्ती नैसर्गिक जलाशयात स्वतंत्र व्यवस्था केलेल्या ठिकाणी केल्यास जलप्रदूषण होणार नाही. तयार केलेल्या कुंडात मूर्ती घातली जाईल मात्र कुंडातील पाणी जलाशयात जाऊ शकणार नाही.

Web Title: The hunger crisis of rural sculptors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.